एक्स्प्लोर
कादर खान यांच्या निधनाची बातमी अफवाच
कादर खान यांच्या मुलाने मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. कादर खान यांच्यावर कॅनेडात उपचार सुरु आहे, असे त्यांचा मुलगा सरफराज याने सांगितले.
![कादर खान यांच्या निधनाची बातमी अफवाच Kadar Khan death news was rumor कादर खान यांच्या निधनाची बातमी अफवाच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/28113613/kadar-khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची बातमी काल रात्री पासून सोशल मीडियावर वायरल होत आहे. मात्र कादर खान यांच्या मुलाने मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. कादर खान यांच्यावर कॅनेडात उपचार सुरु आहे, असे त्यांचा मुलगा सरफराज याने सांगितले.
मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजुक असल्याने त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र ऑल इंडिया रेडिओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. तसेच काल रात्री पासून सोशल मीडियावरही कादर खान यांच्या निधनाची पोस्ट वायरल होत आहे. पंरतू कादर खान यांच्या सोबत कॅनेडात असलेल्या त्यांच्या मुलाने ही अफवा असल्याचं सांगितले.
यापूर्वीही अनेक वेळा कादर खान यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पुन्हा एकदा काल रात्री या गोष्टीची पुनरावृती झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराजने ही माहिती दिली आहे. डॉक्टर त्यांच्या तब्येतची काळजी घेत आहेत. मात्र श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)