एक्स्प्लोर

Jhimma 2 : 'मराठी पोरी' दुनियेला दाखवती माज.. बाईपण जपणारं 'झिम्मा 2'मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; युट्यूबवरही ट्रे़डिंग

Jhimma 2 Song : 'झिम्मा 2' या सिनेमातील 'मराठी पोरी' हे पहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Jhimma 2 New Song Out : 'झिम्मा 2' (Jhimma 2) या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. कोरोनानंतर 'झिम्मा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता प्रेक्षकांना 'झिम्मा 2'ची प्रतीक्षा आहे. 'झिम्मा 2' या सिनेमातील 'मराठी पोरी' (Marathi Pori) हे पहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. युट्यूवरही हे गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. 

'झिम्मा 2'ने टिझरच्या माध्यमातून सर्वत्र 'झिम्मा' मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता या सिनेमातील पार्टी अॅंथम 'मराठी पोरी' हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी 'झिम्मा'च्या गाण्यांनी संगीतप्रेमींना भुरळ घातली होतीच. त्यामुळे आता 'झिम्मा 2' मधील संगीताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'मराठी पोरी'

'मराठी पोरी' या दोन शब्दांमध्येच गाण्याचा भावार्थ कळतो. 'इंदू'च्या 75 व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी' हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. 'मराठी पोरी' हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. 

प्रत्येकीची खासियत सांगणारे 'मराठी पोरी' : अमितराज

'मराठी पोरी' गाण्याबद्दल संगीतकार अमितराज म्हणतात,"प्रत्येकीची खासियत सांगणारे 'मराठी पोरी' हे गाणे आहे. मुळात हे सेलिब्रेशनचे गाणे असल्याने तशा मूडचे संगीत असणे फार आवश्यक होते आणि त्या मूडला साजेसे असेच संगीत आम्ही दिले आहे. यातील कलाकारच इतके भन्नाट आहेत की, संगीतही त्या गाण्याला तितक्याच ताकदीचे हवे होते. क्षितिजच्या गाण्याचे बोलही खूप सुरेख आहेत. ज्यातून प्रत्येकीची ओळख होत आहे.

अमितराज पुढे म्हणाला,"मुळात या सात जणी म्हणजे इंद्रधनूतील सात रंग आहेत आणि हे सात रंग एकरूप झाल्याचा फील या गाण्यातून येतोय. मला खात्री आहे, हे गाणे करताना आम्हीही खूप एन्जॉय केले आहे. त्यामुळे प्रेक्षकही हे गाणे मनापासून एन्जॉय करतील".आदर्श शिंदे म्हणाला,"आमचे पायही हे गाणे गाताना आपसूक थिरकत होते. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे. उत्साह आणि आनंदाने भरलेले आहे. या गाण्याचे चित्रीकरणही कमाल झाले आहे".

'झिम्मा 2' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज (Jhimma 2 Movie Release Date)

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या या सिनेमात दमदार भूमिका आहेत. 24 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Embed widget