एक्स्प्लोर

Ideas Of India 2024: करीना तैमूरला शिकवतेय प्रसिद्धी कशी हाताळायची, म्हणाली, मी त्यावर....

Ideas Of India 2024: एबीपी नेटवर्कच्या आयडियाज् ऑफ इंडिया या कार्यक्रमाला अभिनेत्री करिना कपूर खान हीने देखील हजेरी लावली होती.

Ideas Of India 2024: बॉलीवूड अभिनेत्रींपैकी करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही देखील सर्वात  प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. तिने तिच्या प्रत्येक पात्रात तिचं अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. नुकतच करिना कपूरने एबीपी नेटवर्कच्या 'आयडीयाज् ऑफ इंडिया' (Ideas of India 2024) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने मुलांना प्रसिद्धी कशा प्रकारे हाताळायला शिकवते यावर भाष्य केलं. 

दरम्यान करिना ही तिचं कुटुंब आणि तिचं करियर यांचा मेळ सांधताना पाहायला मिळते. यावर देखील करीनाने भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, प्रत्येकजण हे करू शकतो मग तो पुरुष असो किंवा स्त्री. पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे मी आनंदी आहे आणि आनंद ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त आनंदच मानसिक स्थैर्य देऊ शकतो. जर आनंद नसेल तर नाव, प्रसिद्धी, पैसा, , करिअर, घर, कुटुंब सगळंच उद्ध्वस्त होतं.

करीना तैमूरला शिकवतेय प्रसिद्धी कशी हाताळायची

करीना कपूर खान आणि सेफअली खान यांची दोन्ही मुलं कायमच चर्चेत असतात. तसेच आईवडिलांप्रमाणे मुलंही सध्या प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागली आहे. यावर बोलताना करीना म्हणाली की, मी याकडे फारसं लक्ष देत नाही. जर मी हायपर झाले, जी मी आहे आणि  जर मी ते बाहेर आणले तर त्याचा कुठेतरी तैमूरवर परिणाम होईल. मला काहीतरी त्रास होतोय, हे माहित असून सुद्धा जेव्हा खूप कॅमेरे लागतात तेव्हा मला कळत नाही, हे लोक असे का करत आहेत. फोटो का काढताय? पण यावर सैफने मला खूप चांगली गोष्ट शिकवली आहे. तो मला नेहमी सांगतो अशा वेळी डोकं खाली ठेऊन तिथून बाहेर पडायचं. पण, या सगळ्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. आता तैमूरला समजले आहे की त्याचे आई-वडील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्याला या गोष्टीचं फारसं काही वाटत नाही. 

कामामुळे मुलांसोबत प्रत्येक वेळेस नसल्याची करीनाला वाटते खंत

अभिनेत्री म्हणून शुटींग दरम्यान बऱ्याचदा घरापासून लांब रहावं लागतं. करीनाने म्हटलं की, कामामुळे मुलांसोबत कधी वेळ घालवायला मिळाला नाही, तर त्याची मला खंत वाटते.  जेह फक्त 3 वर्षांचा असल्याने मला त्याच्या बाबतीत थोडं अपराधी वाटतं. त्याच्या शाळेतल्या  परफॉर्मन्सच्या वेळी तिथे असणं मला जास्त गरजेचं वाटतं पण जर मी तिथे हजर राहू शकले नाही, त्याची मला खंत वाटते. पण मी एक काम करणारी आई असणं मला खूप जास्त आवडतं. आता तैमूरला त्याबद्दल काही वाटत नाही, कारण त्याला माहितेय की आपली आई काय करते ते, पण जेह अजून लहान आहे. त्यामुळे मी त्याच्या बाबतीत थोडी भावनिक होते. 

ही बातमी वाचा : 

Ideas Of India 2024: चित्रपट चालला नाही याचं दु:ख आहेच पण..., लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर काय होती आमिर खानची प्रतिक्रिया?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Embed widget