एक्स्प्लोर
...तर केआरकेला घरात जाऊन मारलं असतं : श्रेयस तळपदे
बाकीच्यांसोबत तू काही शहाणपणा करतोयस तो तुझा आणि त्यांचा लुकआऊट आहे. माझ्यासोबत अशा पद्धतीचा शहाणपणा करु नको. तो मेसेज त्याला लाऊड अँड क्लिअर पोहोचला असेल.
मुंबई : वादग्रस्त ट्वीट्समुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कमाल आर खानला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज होती. त्याने पुन्हा शिवीगाळ केली असती, तर त्याला घरात जाऊन मारलं असतं, अशी प्रतिक्रिया अभिनेता श्रेयस तळपदेंने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी कमाल खानने श्रेयस तळपदे दिग्दर्शित आणि सनी देओल-बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या 'पोस्टर बॉईज' सिनेमाविषयी बोलताना या टीका केली होती. कमाल खानने सवयीप्रमाणे खालच्या पातळीवर जात आक्षेपार्ह शब्दही वापरला होता.
कमाल खान औकातीत राहा, ‘त्या’ ट्वीटनंतर श्रेयस तळपदेची सटकली!
त्यानंतर श्रेयसही गप्प बसला नाही. “औकात में रह कमाल खान @#%$. कभी हाथ लगा तो इतनी जोर से पटकूंगा की टप्पा खा के छत से लगेगा. जय महाराष्ट्र,” असं उत्तर श्रेयसने दिलं होतं.
https://twitter.com/shreyastalpade1/status/906424254626856960
केआरके सोबतच्या ट्विटर वॉरबद्दल एबीपी माझाशी बोलताना श्रेयस म्हणाला की, "अशा लोकांना उत्तर द्यायलाच पाहिजे आणि त्यांच्या भाषेतच द्यायला पाहिजे. म्हणून मीही त्याच भाषेत उत्तर दिलं. जाऊ दे, हे लोक असंच बोलतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या ह्या अॅटिट्यूडमुळे ही माणसं शेफारतात. त्याला मेसेज जाणं गरजेचं होतं. बाकीच्यांसोबत तू काही शहाणपणा करतोयस तो तुझा आणि त्यांचा लुकआऊट आहे. माझ्यासोबत अशा पद्धतीचा शहाणपणा करु नको. तो मेसेज त्याला लाऊड अँड क्लिअर पोहोचला असेल. अनेकांनी माझ्या उत्तराला चांगला प्रतिसाद दिला.
मी त्याच्या पातळीवर उतरुन त्याला उत्तर दिलं. त्याला यापेक्षा जास्त महत्त्व देण्याची किंवा बोलायची गरज नाही. त्याला योग्य ठिकाणी आणि योग्य तो लाफा मिळाला होता. नंतर मी त्याला ब्लॉक केलं. मग तो मला काय बोलला हे मला माहित नाही. नंतर तो फक्त सिनेमाबद्दल बोलला असं मला मित्रांकडून कळलं. पण शिवीगाळ केली नव्हती. ती केली असती तर मी घरात जाऊन मारलं असतं त्याला."
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement