Hema Malini Birthday : ही अभिनेत्री वजनामुळे झाली रिजेक्ट, नंतर बनली बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल'
Happy Birthday Hema Malini : बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांना सुरुवातीला वजनामुळे रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यांच्या करिअरबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या.
Hema Malini Birthday Special : बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांचा आज 16 ऑक्टोबर 76 वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी यांनी 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री हेमा मालिनी आज पडद्यावर कमी दिसतात, पण एक काळ असा होता जेव्हा त्यांचं नाव चर्चेत असायचं. त्यांची फॅन आजही जबसदस्त फॅन फॉलोइंग आहे. लोक अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी आजही आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांना सुरुवातीला जास्त वजनामुळे रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यांच्या करिअरबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घ्या.
'ही' अभिनेत्री वजनामुळे झाली रिजेक्ट
हेमा माविनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 मध्ये झाला. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील अम्मानकुडी सामान्य ब्राम्हण कुटुंबात झाला. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पांडव वनवास या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती त्यानंतर 1968 मध्ये त्यांना अभिनेता राज कपूर यांच्यासोबत सपनो के सौदागर चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळेच हेमा मालिनी बॉलिवूडची ड्रिमगर्ल बनली.
अभिनेत्री बनली बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल'
1970 मध्ये आलेला तुम हसीन मैं जवान चित्रपटातून त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी काम केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी शराफत, तुम हसीन में जवान, नया जमाना, राजा जानी, सीता और गीता, पत्थर और पायल, दोस्त, शोले, चरस, जुगनू, अपना खून, आझाद यासह 28 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दरम्यान त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. यानंतर 1980 मध्ये हेमा मालिनी यांनी 13 वर्षांनी मोठे धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं.
आईच्या इच्छेमुळे धरला बॉलिवूडचा रस्ता
हेमा मालिनी यांचं पूर्ण नाव हेमा मालिनी चक्रवर्ती आहे, पण इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्यांना नावातील चक्रवर्ती हटवलं. आईच्या इच्छेमुळे हेमा मालिनी यांनी बॉलिवूडचा रस्ता धरला खरा पण, हा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नव्हता. हेमा मालिनी यांनी बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' होण्याआधी फार संघर्ष केला.
सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बरेच ठिकाणी ऑडिशन्स दिले, पण कमी वजनामुळे त्यांना अनेक ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलं. एका तमिळ चित्रपटाचं शूटींग सुरु झाल्यानंतर त्यांना हटवण्यात आलं. एक तमिळ चित्रपट साईन केल्यानंतर शूटींग सुरु झाल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी चित्रपटातून हटवण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :