एक्स्प्लोर

मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात

मुंबई शहर व उपनगरास मुख्‍यत्‍वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणा-या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी येथे 900 मिलीमीटर झडपेमध्‍ये बिघाड झाला आहे.

मुंबई : राजधानी मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांपैकी एक असलेल्या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये (Water) 5 ते 10 टक्के इतकी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांच्या कालावधीत 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरण्याचा सल्ला महापालिकेकडून देण्यात आला आहे. राज्यात यंदा चांगला पाऊसकाळ झाला असून मुंबईतील सर्वच धरणंदेखील तुडूंब भरली आहेत.  त्यामुळे, मुंबईकरांना यंदा पाण्याची झंझट असणार नाही. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात होत असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. 
 
मुंबई शहर व उपनगरास मुख्‍यत्‍वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणा-या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्‍ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्‍ती करण्‍याचे काम तातडीने हाती घेण्‍यात आले आहे. त्‍यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणा-या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठयामध्‍ये 5 ते 10 टक्‍के घट होणार आहे. या दुरूस्‍ती कामासाठी सुमारे 48 तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांच्या कालावधीत 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

दरम्यान, गत महिन्यातही मुंबई शहरातील के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट)  झडपा (वॉल्व्ह) बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर  पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहनही महानगरपालिका प्रशासनाने केलं होतं. 

हेही वाचा

टोविंग वाहन कर्मचाऱ्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद; वाहनधारकांच्या अंगावर धावून, अरेरावी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech : 52 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे मोठे झाले, पुण्यानंतर बारामती शिक्षणाचे माहेरघरZero Hourमुख्यमंत्र्यांनी झुकतं माप द्यावं,शाहांचं वक्तव्य,राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंचं विश्लेषणZero Hour : न्यायदेवतेवरच्या डोळ्यांवरची पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधानZero Hour : अमित शाहांचं ते वक्तव्य आवाहन की दबावतंत्र? शाहांना नेमकं काय सुचवायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Embed widget