एक्स्प्लोर
DRISHYAM 2 देखील 'या' मर्डर मिस्ट्रीसमोर पानी कम चाय; एका हत्येनं सुरू होते कहाणी, शेवट अक्षरशः चक्रावून सोडतो
Best Murder Mystery Series On OTT: आजवर तुम्ही अनेक क्राईम, मिस्ट्री, थ्रीलर वेब सीरिज पाहिल्या असतील. पण या वेब सीरिजपुढे त्या सर्व वेब सीरिज आणि फिल्म पानी कम चाय आहेत.

Best Murder Mystery Series On OTT | Manvat Murders
1/10

एवढंच काय तर, या वेब सीरिजची पटकथा अजय देवगण अभिनीत गाजलेल्या 'दृश्यम 2' पेक्षाही भारी आहे. सीरिजची सुरुवात एका हत्येच्या घटनेनं होते. पण, पुढे जे घडतं ते तुम्हाला हादरवून सोडतं. तर शेवट अक्षरशः चक्रावून सोडतो. या वेब सीरिजला IMDb वर टॉप रेटिंग मिळालं आहे. (PHOTO : YouTube Grab)
2/10

तुम्ही सध्या मस्तपैकी क्राईम, मिस्ट्री आणि थ्रिलर वेब सीरिज किंवा फिल्म पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 2024 मध्ये आलेली ही वेब सीरिज अजिबात चुकवू नका. मालिकेचं कथानक सस्पेन्स आणि थ्रीलच्या मसाल्यानं मस्त खमंग आहे. दिग्दर्शकानं प्रेक्षकांसमोर ज्या पद्धतीनं सादर केलंय, त्याची बात काही औरच... (PHOTO : YouTube Grab)
3/10

सर्वात आधी एक हत्या होते. त्यानंतर पुढे एकापाठोपाठ एक हत्यांची मालिकाच सुरू होते. हत्येमागे नेमकं कोण? याचा सुगावा पोलिसांनाही लागलेला नाही... पण मग अचानक.... जाऊ देत यापेक्षा पुढे जास्त काही सांगत नाही... स्पॉयलर देण्यापेक्षा तुम्ही स्वतः पाहा... या वेब सीरिजचं नाव आहे, 'मानवत मर्डर्स'. (PHOTO : YouTube Grab)
4/10

'मानवत मर्डर्स' ही वेब सीरिज नुकतीच ओटीटीवर रिलीज करण्यात आली आहे. 'लगान' आणि 'जोधा अकबर' यासारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या आशुतोष गोवारीकर यांनी या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, सई ताम्हणकर आणि इतर अनेक स्टार्स दिसत आहेत. (PHOTO : YouTube Grab)
5/10

या वेब सीरिजची पटकथा 1970 च्या दशकातील आहे. या सीरिजची कथा एका हत्येच्या घटनेनं सुरू होते. सुरुवातीच्या काही मिनिटांतच शेतात काम करणाऱ्या महिलेची दोन नराधमांनी निर्घृण हत्या केली. यानंतर सुमारे 2 वर्षात मानवत गावात अर्धा डझनहून अधिक खून झाल्याची माहिती समोर येते. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुलींचा समावेश आहे. (PHOTO : YouTube Grab)
6/10

दिवसागणित वाढत असलेल्या हत्याच्या घटना पाहून डीसीपी रमाकांत कुलकर्णी (आशुतोष गोवारीकर) यांच्याकडे ही केस सोपवली जाते. पण, हे प्रकरण जसं दिसतं तसं घडत नाही. गावातील महिलांच्या हत्येमागे काळी जादू आणि तंत्र-मंत्र हे प्रमुख कारण असल्याचं रमाकांत कुलकर्णी यांच्या तपासातून समोर आले आहे. (PHOTO : YouTube Grab)
7/10

'मानवत मर्डर्स' वेब सिरीज 8 भागांची आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये एक आश्चर्यकारक खुलासा होतो. मारेकरी पोलिसांच्या तावडीतून निसटल्याचं दिसतं, पण शेवटी एक धक्कादायक गुपित उघड झालं आणि संपूर्ण कट उघडकीस येतो. (PHOTO : YouTube Grab)
8/10

सीरिजच्या प्रत्येक भागात सस्पेन्स वाढत जातो. त्याची कथा अशा पद्धतीनं विणली गेली आहे की, एकदा बघायला सुरुवात केली, तर मधे थांबवावीशी वाटत नाही. 'मानवत मर्डर्स' मालिकेचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केलं आहे. पटकथा, कथा आणि संवाद गिरीश जोशी यांनी लिहिले आहेत. (PHOTO : YouTube Grab)
9/10

आशुतोष गोवारीकर यांची 'मानवत मर्डर्स' ही 2024 मधील सर्वोत्कृष्ट मर्डर-मिस्ट्री मालिका आहे. तुम्ही OTT Sony Liv वर पाहू शकता. ही सीरिज हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
10/10

विशेष बाब म्हणजे, या मालिकेला IMDb वर 7 पेक्षा जास्त रेटिंग मिळालं आहे. त्याचं रेटिंग 10 पैकी 7.6 आहे. (PHOTO : YouTube Grab)
Published at : 15 Oct 2024 09:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
