वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
उठा उठा निवडणूक आली, आता गद्दारांना घरी बसवण्याची पवारवेळ आली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
Amol Kolhe on Jayant Patil : उठा उठा निवडणूक आली, आता गद्दारांना घरी बसवण्याची पवारवेळ आली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेय यावेळी त्यांनी जयंत पाटील (Jayant Patil) मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचा दावा देखील केला आहे. वाळव्याचा माणूस वर्षावर जावा पण पावसाच्या रुपानं वर्षाचं वाळव्यात आली. नियतीच्या मनात आहे. त्यामुळं तुम्हाला ताकद लावावी लागेल असं वक्तव्य कोल्हे यांनाी केलं. यावेळी व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी पुण्यात पंतप्रधानांची सभा होणार होती, पण पावसामुळे ती रद्द झाली. पण इस्लामपूरमध्ये मुसळधार पावसानंतर देखील शरद पवारांची सभा झाल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर पार पडत आहे, यावेळी कोल्हे बोलत होते. हरियाणाच जे काही झालं ते पुणे महाराष्ट्रात होणार नाही, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.
पुढील 35 दिवस काळ आणि वेळ संघर्षाची
पुढील 35 दिवस काळ आणि वेळ संघर्षाची असल्याचे अनोल कोल्हे म्हणाले. आता मतदार संघात पुन्हा सभा घेण्याची गरज नाही, इतकं तुम्ही प्रेम दिल्याचे कोल्हे म्हणाले. शरद पवार यांच्या विचारामुळे शिवस्वराज्य सभेला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची आणि टिकवण्याची निवडणूक असल्याचे कोल्हे म्हणाले.
जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा
गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज इस्लामपूरमध्ये पोहोचली आहे. या यात्रेची सांगता सभा इस्लामपुरामध्ये होता आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यात शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होणार असल्याने आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित झाल्याने या सभेला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, या सभेपूर्वीच जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र शरद पवार आणि पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला. भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाऊस होत असताना सभास्थळी जयंत पाटील छत्री घेऊन उभे होते. भर पावसामध्ये कार्यकर्त्यांकडून जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या: