Salman Khan : सलमान खाननं लॉरेन्स बिश्नोईला उत्तर द्यावं, नाहीतर टायगरचा भित्रेपणा... ; राम गोपाल वर्माच्या ट्वीटने लक्ष वेधलं
Ram Gopal Varma to Salman Khan : सलमान खाननं बिश्नोईच्या धमकीला उत्तर द्यावं, असं म्हणत राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलं आहे.
Salman Khan Bishnoi Gang Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. असं असताना आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ट्वीटने खळबळ माजली आहे. बिश्नोईच्या धमकीला सलमान खाननं उत्तर द्यावे, नाहीतर त्याला भ्याडपणा समजला जाईल असं राम गोपाल वर्माने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राम गोपालची एक्स मीडियावरील ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
सलमान खाननं बिश्नोईला उत्तर द्यावं
एकीकडे सलमान खान बिश्नोई गँगकडून धमकी मिळत असताना 'भाईजान'नं याला उत्तर द्यावं, असं राम गोपाल वर्मानं म्हटलं आहे. राम गोपालनं एक्स मीडिया म्हणजेच आधीचं ट्वीटर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना लिहिलंय, "माझी इच्छा आहे की, सलमान खान बी ला सुपर काउंटर थ्रेट द्यावं नाहीतर, यामध्ये टायगरचा भित्रेपणा दिसेल. एस के ब च्या तुलनेत मोठा सुपर हिरो म्हणूनवर येण्यासाठी त्याच्या चाहत्यांचा ऋणी आहे".
"नाहीतर टायगरचा भित्रेपणा..."
राम गोपाल वर्माच्या (Ram Gopal Varma) या ट्वीटने एकच खळबळ माजली आहे. या ट्वीटमुळे आता सलमान खान (Salman Khan) आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्यातील तणाव वाढला आहे. 1998 मधील काळवीट शिकार प्रकरण लॉरेन्स बिश्नोईच्या रागाचं कारण आहे. याचं कारणामुळे बिश्नोई गँग वारंवार सलमान खानला धमकी देत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता काही दिवसांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून सलमान खानसोबतची मैत्री यामागचं कारण असल्याचं म्हटलं आहे.
राम गोपाल वर्माचं ट्वीट ( Ram Gopal Varma Tweet Viral)
I wish @BeingSalmanKhan will give a SUPER COUNTER THREAT to B or otherwise , it will look like a COWARDICE of the TIGER STAR ..S K owes it to his fans to rise up as the BIGGER SUPER HERO in comparison to B
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 15, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :