(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 2’ ची बंपर ओपनिंग! पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला
‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे.
Drishyam 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट काल (18 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘दृश्यम 2’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘दृश्यम 2’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली आहे. दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. रिपोर्टनुसार, जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
अजय देवगनसोबतच या चित्रपटात तबू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' हा मोहनलालचा मल्याळम चित्रपट 'दृश्यम 2' चा हिंदी रिमेक आहे. दृश्यम चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला. दृश्यमच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
कलाकारांचे मानधन
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Drishyam 2: कुणी 30 कोटी तर कुणी 2 कोटी... 'दृश्यम-2' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन