(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diwali Special Ovya : 'ओव्यांचा खजिना' प्रेक्षकांची दिवाळी करणार खास
Diwali Special Ovya : 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांसाठी येत्या दिवाळीत 'ओव्यांचा खजिना' घेऊन आले आहे. प्रेक्षकांना 23 प्रकारच्या विविध ओव्या ऐकायला मिळणार आहेत.
Diwali Special Ovya On Planet Marathi : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, रांगोळी, फराळ, फटाक्यांची आतिशबाजी, किल्ला, एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू. या दिवाळीत अशीच एक अमूल्य भेटवस्तू 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ती भेट म्हणजे 'ओव्यांचा खजिना'. प्रेक्षकांना 23 प्रकारच्या विविध ओव्या ऐकायला मिळणार आहेत.
दिवाळीचा सण हा आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्याच पद्धतीची एक अमूल्य आणि आपल्या मराठी संस्कृतीचा ठेवा असणारी एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. ती म्हणजे शेकडो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अगदी वारसा हक्काने मिळणाऱ्या आणि आपला इतिहास चालीत गुंफणाऱ्या आपल्या ओव्या. या ओव्यांचा गोडवा आजच्या तरुणपिढीसोबतच प्रेक्षकांना कळावा, यासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी 'ओव्यांचा खजिना' घेऊन येत आहे.
या 'ओव्यांचा खजिन्या'त प्रेक्षकांना तब्बल 23 प्रकारच्या विविध ओव्या ऐकायला तसेच पाहायला मिळणार आहेत. या सर्व ओव्यांचे दिग्दर्शन ज्योती शिंदे यांनी केले आहे. तर समीरा गुजर-जोशी हिने तिच्या गोड आवाजात या ओव्यांचे वाचन तसेच विश्लेषण केले आहे. अनेक वर्षांपासून अजरामर ठरलेल्या परंतु आता कालबाहय होऊ पाहणाऱ्या या ओव्यांमधून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या ओव्यांमध्ये आपल्या इतिहासातील अनेक संदर्भ लपलेले आहेत. या दिपावलीत ओव्यांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची आपल्याला नव्याने ओळख होणार आहे. 'ओव्यांचा खजिना' या पारंपरिक कार्यक्रमातून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा सुंदर अभिनय प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच समृद्ध आणि चैतन्यमय होणार आहे.
Diwali Guidelines : फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, राज्य सरकारच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना
'ओव्यांचा खजिना' ची निर्मिती करणारे अक्षय बर्दापूरकर म्हणाले,"दिवाळी येत आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. आपल्या परंपरेच्या आणि संस्कृतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. या गोष्टींचे जतन करायलाच हवे. त्यापैकीच एक असलेल्या ओव्या. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत 'ओव्यांचा खजिना' आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' घेऊन येत आहे. यात अनेक प्रकारच्या ओव्या आहेत ज्या आपल्या इतिहासाशी आपली नाळ जोडतील. आपली मराठी संस्कृती जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."