एक्स्प्लोर
'सुलतान'पेक्षा आमीरचा 'दंगल' जबराट : सलमान खान
मुंबई: प्रदर्शनापूर्वीच तुफान चर्चेत असलेल्या आमीर खानचा दंगल सिनेमा अखेर आज रिलीज झाला आहे. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला दंगल, प्रेक्षकांचीही मनं जिंकेल, असा विश्वास दंगल टीमला आहे.
दंगल हा सिनेमा कुस्तीपटू महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. यापूर्वी सलमान खाननेही कुस्तीवर आधारित सुलतान हा सिनेमा केला होता.
मात्र आता स्वत: सलमानने सुलतानपेक्षा दंगल उत्कृष्ट असल्याची पावती दिली आहे.
दंगलच्या स्क्रीनिंगला सलमान खानच्या कुटुंबाने हजेरी लावली. त्यानंतर सलमानने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो" असं ट्विट सलमानने केलं.
यावर आमीर खाननेही त्याच्या स्टाईलने सलमानला रिप्लाय दिला. आमीरने 'देल्ली बेल्ली' गाण्याचा आधार घेत, तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू'My Family saw #Dangal today evening and thought it was a much better film than #Sultan. Love u personally Aamir but hate u professionally ! pic.twitter.com/sJlDG7u95c
— Salman Khan (@BeingSalmanKhan) December 22, 2016
@BeingSalmanKhan Sallu, in your "hate" I feel only love. "I love you like I hate you" ???? — Aamir Khan (@aamir_khan) December 22, 2016दंगल या सिनेमात आमीर खानशिवाय सांक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाला समीक्षकांनी भरभरुन स्टार्स दिले आहेत. एबीपी माझानेही दंगलला पाचपैकी चार स्टार दिले आहेत.
रिव्ह्यू : कसा आहे आमीरचा 'दंगल'?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement