Coronavirus | कोरोनाच्या लढ्यात अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात; एक लाख मजुरांना मदत
कोरोना विरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी धावून आले आहेत. अशातच आता बिग बी अमिताभ बच्चन यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई : कोरोना विरोधातील लढ्यासाठी देशभरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. अशातचा आता बॉलिवूडचे महानायकही मदतीसाठी पुढे आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉइज कन्फेडरेशनशी निगडीत एक लाख मजदूरांच्या कुटुंबियांना महिन्याभराचं राशन पुरवण्याचा संकल्प केला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्सने अमिताभ बच्चन यांच्या या मदतीचं समर्थन केलं आहे.
सोनी पिक्चर्स नेटवर्कने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार, 'ज्या गंभीर स्थितीत आपण आहोत, त्यामध्ये श्रीमान बच्चन यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला संकल्प 'व्ही आर वन'चं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्सने समर्थन केलं आहे. यामार्फत देशभरातील एक लाख कुटुंबांना महिन्याभराच्या राशनसाठी वित्तपोषण देण्यात येणार आहे.'
दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही की, कधीपर्यंत ही मदत मजदुरांपर्यंत पोहोचणार आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे सीईओ एन. पी. सिंह यांनी सांगितले की, 'आपल्या सीएसआर अंतर्गत एसपीएनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एकत्र येऊन भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन उद्योगातील मजुरांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.' सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे सीईओ एन. पी. सिंह यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'एसपीएनचं समर्थन कमीत कमी 50 हजार मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक महिन्याचं राशन देणार आहे.'
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या आधी शाहरूख खानने देखील मदत करणार असल्याची घोषणा केली होती. त्याने आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. त्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रूपये मदत केली आहे. तर कार्तिक आर्यन आणि विक्की कौशलनेदेखील प्रत्येकी एक कोटी रूपयांची मदत केली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदतCoronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत
लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर
coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत