एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती

कोरोना विरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी धावून आले आहेत. अशातच बॉलिवूडचा किंग खानही मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने देशात हैदोस घातला आहे. अशातच कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग पुढे सरसावला आहे. अनेक उद्योजक, सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच बॉलिवूडचा किंग खानही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने आपली कंपनी रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, रेड चीलीज वीएफएक्स, आयपीएल क्रिकेट टीम कोलकत्ता नाइट रायडर्स आणि आपल्या मीर फाऊंडेशनमार्फत मदत करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

शाहरूख खान कशाप्रकारे आणि कुठे मदत करणार, याबाबतची माहिती रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर करण्यात आली आहे. याबाबत दोन पानांचं एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये मदतीबाबत संपूर्म माहिती देण्यात आली आहे. या स्टेटमेंटनुसार, किंग खान आपल्या कंपन्यांमार्फत मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता या शहरांमध्ये मदत करणार आहे.

शाहरूख खानने रेड चिलीज एन्टरटेन्मेंटचं ट्वीट रिट्वीट करत लिहिलं आहे की, 'सध्याच्या वेळी हे गरजेचं आहे की, ज्या व्यक्ती आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्या तुमच्याशी निगडीत नाहीत, तुमच्यासाठी अनोळखीदेखील असतील, त्या लोकांना पटवून द्या ते एकटे नाहीत. आपण सर्व एकमेकांसाठी काहीतरी करू. भारत आणि सर्व भारतीय एक कुटुंब आहे.'

शाहरूख खानने आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिलं आहे की, 'रात्रीनंतर एका नव्या दिवसाची सुरुवात होणार आहे, हा दिवस बदलणार नाही, तारिख मात्र नक्की बदलेल.' याचसोबत शाहरूख खानने सर्वांसाठी आणि सर्वांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच त्याने लोकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहनदेखील केलं आहे. शाहरूखने यासंदर्भात बोलताना सांगितले आहे की, '...आणि कृपया काही दिवसांसाठी सोशल डिस्टंन्सिंग पाळा... थोडं लांब, आणखी लांब, आणखी लांब.'

किंग खान कशी करणार मदत; येथे वाचा...

1. शाहरूख खान, गौरी खान, जूही चावला मेहता आणि जय मेहता यांच्या मालकीच्या आयपीएल (IPL)ची टीम कोलकत्ता नाइट रायडर्सने PM-Cares fundमध्ये एक रक्कम देण्याची घोषणा केली असून त्यांनी दान करण्यात येणारी रक्कम उघड केलेली नाही.

2. शाहरूख खान आणि गौरी खानच्या मालकीच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये योगदान करणार असल्याचं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी अझीम प्रेमजी यांची 1125 कोटींची मदत

3. मीर फाऊंडेशन आणि कोलकत्ता नाइट रायडर्स एकत्रितरित्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकारसोबत एकत्र काम करणार आहे. तसेच 50,000 पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स (PPE) देणार आहेत.

4. मीर फाऊंडेशन, एकत्रितरित्या - द अर्थ फाऊंडेशनसोबत मुंबईतील 5,500 कुटुंबियांसाठी कमीत कमी एक महिन्यासाठी अन्यधान्य पुरवणार आहेत. एका स्वयंपाकघराची सुरुवात करण्यात येणार असून 2000 ताज्या जेवणाचे पॅकेट्स दररोज घरांमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये पाठविण्यात येणार आहे.

5. मीर फाऊंडेशन, रोटी फाऊंडेशनसोबत एकत्र येऊन कोरोना व्हायरसमुळे समस्यांचा सामना करणाऱ्या बेघर आणि मजूरांच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे. ते 3,00,000 जेवणाच्या पॅकेट्सचं वाटप करणार आहे. त्यामुळे 10,000 लोकांना जवळपास एक महिन्यांपर्यंत ताजं जेवणं मिळणार आहे.

6. वर्किंग पीपल्स चार्टरसोबत एकत्र येऊन मीर फाऊंडेशन दिल्लीमधील 2,500 मजूरांना कमीत कमी एका महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा आहे.

7. मीर फाऊंडेशन उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये 100 पेक्षा जास्त अॅसिड अटॅक पीडितांसाठी त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महिन्यांची मदत देणार आहे.

या स्टेटमेंटमार्फत शाहरूख खानने सांगितलं आहे की, ही एक सुरुवात आहे आणि कंपनीचे सर्व सदस्य पुढेही देशासाठी मदत करतील. संपूर्ण भारतामध्ये जी गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू.

दरम्यान, शाहरूख खानच्या आधी अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. त्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रूपये मदत केली आहे. तर कार्तिक आर्यन आणि विक्की कौशलनेदेखील प्रत्येकी एक कोटी रूपयांची मदत केली आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत

Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत

लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर

coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Embed widget