Gururaj Jois Passed Away: 'लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gururaj Jois Passed Away: 27 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुराज जोइस यांचे निधन झाले. गुरुराज यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
![Gururaj Jois Passed Away: 'लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास cinematographer gururaj jois passed away aamir khan productions mourns Gururaj Jois Passed Away: 'लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/3787bb6142985b2a580f0696b1aee7c41701252910657259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gururaj Jois Passed Away: अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) 'लगान' ( Lagaan) या चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस (Gururaj Jois) यांचे निधन झाले आहे. 27 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गुरुराज यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मूल असं कुटुंब आबे. गुरुराज जोइस यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली.
'या' चित्रपटांची केली सिनेमॅटोग्राफरी (Gururaj Jois Passed Away)
गुरुराज जोइस यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोईस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण श्रद्धांजली वाहात आहेत. गुरुराज यांनी शूट केलेल्या चित्रपटांमध्ये मुंबई से आया मेरा दोस्त, शूटआउट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, एक अजनबी, जंजीर आणि गली गली चोर है या चित्रपटांचा समावेश आहे. आमिर खानच्या लगान या चित्रपटासाठी देखील गुरुराज जोइस यांनी कॅमेऱ्या मागे काम केले.
बॉलिवूडवर शोककळा
गुरुराज जोइस यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शोक व्यक्त करण्यात आला आहे. आमिर खान प्रोडक्शन्सनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "गुरुराज जोईस यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. त्यांनी कॅमेर्यामागील कामाने लगान चित्रपट जिवंत केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो" आमिर खान प्रोडक्शन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गुरुराज जोईस यांचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कमेंट करुन अनेकांनी गुरुराज जोइस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून करिअरला केली सुरुवात
गुरुराज जोइस हे हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कॅमेरा वर्कसाठी ओळखले जात होते. अनेकांनी त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले आहे. गुरुराज जोईस यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)