एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अजय देवगण मैदानात
मुंबई : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणजेच अजय देवगण मैदानात उतरला आहे. मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलने गुन्हेगारीविरोधात जनजागृती करण्यासाठी त्याची निवड केली आहे.
अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. यात अभिनेता अजय देवगण लोकांना भामट्यांपासून सावधान राहण्याचं आवाहन करताना दिसतो आहे.
'बँक कर्मचारी असल्याचं सांगून कुणी तुमचं कार्ड ब्लॉक करण्याच्या नावावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सीव्हीव्ही किंवा पासवर्ड मागत असेल, तर तुम्ही त्यांना तुमचा पासवर्ड अजिबात देऊ नका. तुम्हाला केलेला तो कॉल फ्रॉड असू शकतो, असं अजय या व्हिडीओतून सांगतो आहे.@ajaydevgn is aware that banks don't ask for any sensitive details over phone & we hope you know it too. Ignore his advice at your own peril pic.twitter.com/f0sOC4hmhX
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 16, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement