Bollywood Movies : सिनेसृष्टी पुन्हा बहरली, थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच
Bollywood Movies : अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे सध्या प्रदर्शित होत आहेत.
Bollywood Movies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी- मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याचा मराठी सिनेमांना मात्र फटका बसत आहे. तरीही 'झिम्मा', 'पावनखिंड' सारखे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. तर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा आणि दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. लवकरच 'चाबूक', 'लकडाऊन', 'पॉंडेचेरी', '143', 'झटका', 'एक नंबर', 'रुद्रा', 'हवा हवाई', 'विशू', 'मी वसंतराव', 'चंद्रमुखी' हे मराठी सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत.
'हे' बिग बजेट हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर करणार धुमाकूळ
'झुंड', 'जर्सी', 'आरआरआर', 'राधेश्याम', 'पृथ्वीराज', 'अटॅक', 'द काश्मिर फाईल्स', 'मेजर', 'गंगूबाई काठियावाडी', 'बच्चन पांडे', 'रॉकेटरी', 'धाकड', 'केजीएफ 2', 'हिरोपंती 2'
अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे बऱ्याच दिवसांनी सिनेमागृहात प्रदर्शित होत असल्याने सिनेमांना थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच करावी लागणार आहे. मार्चमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यांना हवे ते सिनेमे सिनेमागृहात जाऊन पाहू शकतात. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बच्चन पांडे'पासून (Bachchan Pandey) प्रभासच्या (Prabhas) 'राधे श्याम'पर्यंत (Radhe Shyam) अनेक सिनेमे मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Movies releasing in March : अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'पासून प्रभासच्या 'राधे श्याम'पर्यंत 'हे' सिनेमे मार्चमध्ये होणार प्रदर्शित
Sonu Sood : सोनू सूदने 'रोडीज'च्या शूटिंगला केली सुरुवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha