एक्स्प्लोर
अरबाज-मलायकाच्या घटस्फोटाचं कारण वर्षभराने समजलं?
अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. अरबाजच्या याच सवयीमुळे अरबाज-मलायकामध्ये वितुष्ट आल्याची चर्चा आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाचं कारण आज समोर आल्याची चर्चा आहे. अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. अरबाजच्या याच सवयीमुळे अरबाज-मलायकामध्ये वितुष्ट आल्याची चर्चा आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने पोलिसांसमोर दिली. आज अरबाज खान आणि बुकी सोनू जलाल यांची पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली.
आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.
आजच्या चौकशीदरम्यान अरबाजने आपण आयपीएलच नव्हे तर कसोटी सामन्यांवरही सट्टा लावल्याची कबुली दिली. सूत्रांच्या मते, गेल्या 5-6 वर्षांपासून अरबाज आयपीएलवर सट्टा लावत होता. सट्टा लावणं ही त्याची सवय झाली होती.
सलमानची मध्यस्तीही वाया, मलायका-अरबाजचा घटस्फोट निश्चित?
आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला. मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज कोणाला डेट करतोय? अरबाज आणि मलायका यांच्यात घटस्फोट होण्यामागे हेही एक कारण होतं. मलायक अरबाजला सट्टा खेळण्यापासून रोखत होती. मात्र अरबाज तिला जुमानत नव्हता. त्याच्या याच सवयीमुळे दोघांमध्ये वाद होत असे. 18 वर्षांचा संसार मोडला, अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट गेल्या वर्षी म्हणजेच 12 मे 2017 रोजी अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाला होता. मुंबईच्या वांद्रे येथील कोर्टात दोघांनीही घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केलं. अरबाज आणि मलायका या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याला 12 मे रोजी कोर्टाची मंजुरी मिळाली. कोर्टाच्या मंजुरीनंतर दोघांचं 18 वर्षांचं नात संपलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement