![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
आली लग्न घटीका समीप! मोकळे केस, हिऱ्याचा हार, टिकली अन् बरचं काही, अंबानींच्या होणाऱ्या सुनेनं वेधलं लक्ष; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात
Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.
![आली लग्न घटीका समीप! मोकळे केस, हिऱ्याचा हार, टिकली अन् बरचं काही, अंबानींच्या होणाऱ्या सुनेनं वेधलं लक्ष; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात Anant Ambani and Radhika Merchant Wedding het for her look in lagan lakhvanu aka kankotri bride to be looks stunning in an Anamika Khanna lehenga beautiful photos Viral Social Media Marathi News आली लग्न घटीका समीप! मोकळे केस, हिऱ्याचा हार, टिकली अन् बरचं काही, अंबानींच्या होणाऱ्या सुनेनं वेधलं लक्ष; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/32075ede2f5904365127ecbfdcedb94a1708091101966254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चेंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. लगन लखवानु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शला सुरुवात झाली आहे. नुकतचं गुजरात येथील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचा लगन लखवानु हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमादरम्यान राधिका खूपच सुंदर दिसत होती. तिचे लक्षवेधी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राधिकाच्या लेहेंग्याने वेधलं लक्ष
लगन लखवानु या कार्यक्रमादरम्यान राधिका मर्चेंटने डिझायनर अनामिका खन्नाने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावरील फ्लोरल वर्क चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या लूकमध्ये राधिका खूपच एलीगेंट दिसत होती. लेहेंग्यावर तिने हिऱ्याचा हार घातला होता. तिची लाल रंगाची टिकलीदेखील खूपच लक्षवेधी होती. कोणतीही भारी हेअरस्टाईल करण्यापेक्षा राधिकाने मोकळे केस ठेवायला पसंती दर्शवली. तसेच सटल मेकअपमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट कधी लग्न करणार? (Anant Ambani Radhika Merchant Wedding Date)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री वेडिंग कार्ड काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं आहे. वेडिंग कार्डनुसार, 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा चालणार आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. गुजरात येथील जामनगरमध्ये जुलैमध्ये ते लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. अद्याप अंबानी कुटुंबियांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना मिळणार खास भेट
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना एक खास भेट मिळणार आहे. दिव्यांग मुलांनी आपल्या हाताने बनवलेल्या खास मेणबत्त्या पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. अत्यंत शाही पद्धतीत अनंत-राधिका यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
संबंधित बातम्या
Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मंर्चंटच्या लग्नात सुरांची मैफिल सजणार, बॉलिवूडचे 'हे' दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)