Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मंर्चंटच्या लग्नात सुरांची मैफिल सजणार, बॉलिवूडचे 'हे' दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट परफॉर्म करणार आहेत. आता या कार्यक्रमात कोण गायक परफॉर्मन्स करणार याचीही यादी समोर आली आहे.
Anant Ambani Radhika Merchant Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत त्याची दीर्घकाळापासूनची प्रेयसी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसंमारंभात अनेक बॉलिवूड दिग्गज परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासह बॉलिवूडचे प्रसिद्ध गायकही लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहेत.
लग्नात सुरांची जादू पसरणार
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसमारंभ 1 मार्च ते 3 मार्च या दरम्यान होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसंमारंभाची रंगत वाढवण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड गायकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये अरिजित सिंग (Arijit Singh) ते प्रीतम (Pritam) आणि हरिहरन (Hariharan) यांच्यासारखे दिग्गज गायक अनंत अबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्यांच्या सुरांची जादू पसरवतील असं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक माहिती समोर आलेली नाही. मात्र या भव्य विवाह सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
रणबीर आणि आलियाचा डान्स परफॉर्मन्स
नुकतंच रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हे कपल त्यांची मुलगी राहासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसले होते. ते दोघेही गुजरातला रवाना झाल्याच्या बातम्या येत होत्या. गुजरातमध्ये रणबीर आणि आलियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा आकाश अंबानीसोबत दिसत होते. हे पाहून रणबीर आणि आलिया लग्नात खास डान्स परफॉर्मन्स देणार असल्याची अटकळ बांधली जात होती. कोरिओग्राफीचा सराव करण्यासाठी दोघेही गुजरातला पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे.
अनंत आणि राधिकाचं लग्न
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका अंबानी कुटुंबाकडून याआधीच जारी करण्यात आली आहे. त्यानुसार दोघांच्या लग्नाचे फंक्शन 1 मार्च ते 3 मार्चपर्यंत चालणार आहे. गुजरातमधील जामनगर या मुकेश अंबानींच्या मूळगावी हे लग्न होणार असून त्यासाठी बॉलिवूडसह इतर सर्वच क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: