Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय; कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिग बींचं वक्तव्य
KOlkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं आहे.
Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं.
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान अमिताभ बच्चन म्हणाले,"आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला खात्री आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हे मान्य करेल".
अमिताभ पुढे म्हणाले,"एखाद्या सिनेमाची निवड करण्याबद्दल सध्या खूप विचार केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सिनेमांची निर्मिती होत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच हे सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृह ते ओटीटी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येत आहेत. आपण प्रेक्षकांना गृहित धरू शकत नाही. त्यामुळे त्यांना काय पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे".
View this post on Instagram
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत अमिताभ बच्चन, शाहरुख खान (Shah Rukh Khan), जया बच्चन (Jaya Bachchan), राणी मुखर्जीसह (Rani Mukerji) अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. दरम्यान शाहरुख खानने त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,"काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर सिनेमा हे समाज बदलण्याचं माध्यम आहे.
संबंधित बातम्या