Amey Wagh, Sumeet Raghvan : अमेय वाघ अन् सुमीत राघवनचा सोशल मीडिया वॉर; अमेय म्हणाला 'राघू' तर, सुमीत म्हणतोय 'सर्कशीतला वाघ'!
अमेय वाघ (Amey Wagh) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांच्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Amey Wagh, Sumeet Raghavan: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्री या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अनेक वेळा सेलिब्रिटी हे वेगवेगळे विषय सोशल मीडियावर मांडतात. काही वेळा या पोस्टमधून ते एखाद्या व्यक्तीवर टिका करतात, तर काही वेळा ते स्वत:ची मतं मांडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सध्या अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांच्यामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. हे दोघे एकमेकांवर टिका करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात.
अमेय वाघनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतातत पण वाघ एकच असतो. कृपया नोंद घ्यावी.' त्यानंतर अमेयच्या या पोस्ट उत्तर देत सुमीतनं पोस्ट शेअर केली, 'सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय...कसं ना फक्त अडनाव वाघ असल्यानं कोणी वाघ होत नाही. याचीही कृपया नोंद घ्यावी. ' अमेय आणि सुमीत यांच्यामध्ये सोशल मीडियावर सुरु असलेला वॉर इथेच थांबला नाही. नंतर अमेयनं पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय, सुमीत राघवन' या दोघांच्या या पोस्ट्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
वाद की प्रमोशनचा नवा फंडा?
सुमीत आणि अमेय यांच्या फेसबुक पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे काही प्रोमोशन आहे का कसलं?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आडनावावरून भांडताय?' आता अमेय आणि सुमीत हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशा पोस्ट करत आहेत की, खरंच त्यांचा वाद सुरु आहे हे लवकरच या दोघींच्या चाहत्यांना कळेल.
सुमीत आणि अमेयच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती
सुमीत आणि अमेयच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अमेयचा झोंबिवली हा चित्रपटा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर सुमीतचा एकदा काय झालं हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Jawan: बॉलिवूड ‘किंग’ शाहरुख खानचा जलवा, ‘जवान’चे शूटिंग पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बंपर कमाई!