एक्स्प्लोर

Cuttputlli trailer out : अक्षय कुमारच्या ‘कटपुतली’चा दमदार ट्रेलर रिलीज, ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट!

Cuttputlli trailer out : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट 'कटपुतली'चा (Cuttputlli) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Cuttputlli trailer out : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट 'कटपुतली'चा (Cuttputlli) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटात अक्षय पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो हत्येचे गूढ उकलत सीरियल किलरला पकडताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यामध्ये हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

अक्षय कुमारचा नुकताच आलेला 'रक्षाबंधन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता यानंतर अक्षय कुमारने ठरवलेय की, तो त्याचा पुढचा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTT वर रिलीज करणार आहे. त्याच्या 'मिशन सिंड्रेला' या चित्रपटाचे नाव बदलून ‘कटपुतली’ करण्यात आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याच्या कथेची आणि कथानकाची कल्पना येते.

पाहा ट्रेलर

‘कटपुतली’ ही कथा आहे एका सीरियल किलरची आणि पोलिस तपासाची, ज्यामध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा खाकी वर्दीत दिसणार आहे.

कुठे रिलीज होणार चित्रपट?

या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची माहिती स्वतः चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमार याने दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले की, ‘तीन हत्या, एक शहर.. एक पोलिस आणि एक सिरीयल किलर... कटपुतली 2 सप्टेंबरला फक्त डिस्ने+हॉटस्टारवर.’

या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. हा टीझर जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्येच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे, तर थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचीही माहिती देण्यात आली होती. चित्रपटाचा टीझर शेअर करताना अक्षय कुमारने एक मनोरंजक कॅप्शनही लिहिले होते. त्याने लिहिले की, 'हा खेळ सत्तेचा नसून मनाचा आहे. आणि या मनाच्या खेळात तू आणि मी... सगळे कटपुतली आहोत.'

वर्षातील चौथा चित्रपट

विशेष म्हणजे या वर्षात आतापर्यंत अक्षयचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांचा 'बच्चन पांडे' हा वर्षातील पहिला चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. पण, हा चित्रपट लोकांना फारसा आवडला नाही. यानंतर त्याचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्याचवेळी त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला 'रक्षा बंधन' या चित्रपटानेही प्रेक्षकांची निराशा केली आहे. आतापर्यंत हा चित्रपट फारशी कमाई करू शकलेला नाही.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget