(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Singham Again : अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'ची रिलीज डेट जाहीर; लवकरच शूटिंगला होणार सुरुवात
Singham Again Update : अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ajay Devgn Movie Singham Again Release Date : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. 'सिंघम' (Singham) या गाजलेल्या सिनेमाचा तिसरा भाग अर्थात 'सिंघम अगेन' (Singham Again) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
'सिंघम अगेन' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Singham Again Release Date)
अजयच्या 'सिंघम अगेन' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 'सिंघम अगेन' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'सिंघम' आणि 'सिंघम 2' हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून ते आता 'सिंघम 3'ची प्रतीक्षा करत आहेत.
अजय देवगण आणि रोहित शेट्टी ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. अनेक चांगल्या प्रोजेक्टचा ते दोघे भाग आहेत. दोघांनी याआधी 'सूर्यवंशी' या सिनेमासाठी काम केलं होतं. हा सिनेमा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात अक्षय कुमार, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. तसेच अजय आणि रोहितचे 'सिंघम' (2011), 'सिंघम रिटर्न्स' (2014), 'सिम्बा' (2018) सारखे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
View this post on Instagram
रोहित-अजयचे आगामी प्रोजेक्ट (Rohit Shetty Ajay Devgn Upcoming Project)
रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'इंडियन पोलीस फोर्स' (Indian Police Force) या वेबसीरिजचं काम करत आहे. या सीरिजच्या माध्यमातून तो ओटीटी विश्वात पाऊल ठेवत आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
दुसरीकडे अजय देवगणचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. आता त्याचा 'मैदान' (Maidan) हा क्रीडाविषयक सिनेमा 23 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या