Aishwarya Rai : जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक? आराध्याचा सोशल मीडियावरचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत
Aishwarya Rai-Aaradhya at Jalsa : घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. आराध्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
![Aishwarya Rai : जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक? आराध्याचा सोशल मीडियावरचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत Aishwarya rai spotted at Bachchan home jalsa with daughter aaradhya fans are worried for her amid divorace rumours abhishek Bachchan video viral Aishwarya Rai : जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक? आराध्याचा सोशल मीडियावरचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/c0c97447fcd04fde6019400ee5ce733e1725430205639322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aaradhya Bachchan Video : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्य राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा समोर येत असताना ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबाच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. ऐश्वर्या राय मुलगी आराध्यसोबत जलसा बंगल्यावर पोहोचली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघींनी अभिषेक बच्चनच्या नवीन कारमधून प्रवास केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची अडवणूक?
अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र नाहीतर वेगळे दिसले, ज्यामुळे या अफवांना पेव फुटला आहे. आता ऐश्वर्या आणि आराध्याच्या आणखी एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे, ज्यामध्ये दोघी जलसा बंगल्यामध्ये पोहोचल्याचं दिसत आहेत. जलसा बंगल्यावर ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये, ऐश्वर्या राय हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी आराध्या शाळेच्या गणवेशात दिसत आहे.
आराध्याचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत
जलसा बंगल्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत पोहोचली. हे पाहून अभिषेक-ऐश्वर्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. पण, आराध्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही युजर्संनी चिंता व्यक्त केली आहे. जलसा बंगल्यामध्ये आराध्यासोबत गैरवर्तन होत असल्याचे अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यामागचं कारण जाणून घ्या.
पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी आराध्याबद्दल व्यक्त केली चिंता
व्हायरल व्हिडीओमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या अभिषेक बच्चनच्या नवीन कारमधून खाली उतरताना दिसत आहे. यावेळी, एक व्यक्ती गाडीचा दरवाजा बंद करण्यासाठी उभा असल्याचं दिसत आहे. आराध्या गाडीतून खाली उतरताच ती व्यक्ती आराध्याला थांबवते. मग आराध्या कारमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करते आणि हा व्यक्ती गेट बंद करू लागतो, ज्यामुळे आराध्याला गेटचा थोडासा धक्का बसतो.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी आराध्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या लक्षात ही बाब येताच युजर्सने यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक होत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आराध्याला जलसामध्ये चांगली वागणूक दिली जात नाही, असं म्हणायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली. काही युजर्सनी आराध्याबद्दल चिंताही व्यक्त केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Vivek Oberoi : ऐश्वर्यावर प्रेम अन् सलमानसोबतचा वाद, बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्यावर विवेक ऑबेरायचं आयुष्य कसं होतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)