एक्स्प्लोर
सनी लिओन पुन्हा आई झाली
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सनीने आपला आनंद व्यक्त केला आहे. अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी चिमुरड्यांची नावं आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सनी लिओन दोन मुलांची आई झाली आहे. त्यामुळे सनी आणि पती डॅनिएल वेबर यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे.
गेल्या वर्षा लातूरमधून मुलगी दत्तक घेतल्यानंतर सनी पुन्हा दोन मुलांची आई झाली. मात्र सनी सरोगसीद्वारे आई झाली, की तिने दोन मुलांना दत्तक घेतलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सनीने आपला आनंद व्यक्त केला आहे. अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी चिमुरड्यांची नावं आहेत.
सनी आणि डॅनिएल वेबरने गेल्या वर्षी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणमधून (कारा) निशा नावाच्या (त्यावेळी) 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं.
दत्तक मुलीचा फोटो शेअर केल्याने सनी अडचणीत
'देवाची मर्जी!! 21 जून 2017 रोजी आम्हाला समजलं आम्ही अल्पावधीतच तीन मुलांचे पालक होऊ शकतो. आम्ही निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरु केले. अनेक वर्षांनी आमचं कुटुंब अॅशर सिंग वेबर, नोआ सिंग वेबर आणि निशा कौर वेबर यांच्या रुपाने पूर्ण झालं. काही आठवड्यांपूर्वी आमच्या मुलांचा जन्म झाला, मात्र आमचे डोळे आणि हृदयात ते अनेक वर्षांपासून जिवंत होते. देवाने आमच्यासाठी खास योजना आखली आणि आम्हाला मोठं कुटुंब दिलं. आम्ही दोघं तीन सुंदर मुलांचे पालक झालो आहोत. सुखद धक्का' असं सनीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.सनीचा पती डॅनिएल वेबरनेही ट्विटरवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 'नोआ आणि अॅशर यांना हेल्लो म्हणा. आयुष्याचा नवा अध्याय. करण, निशा, नोआ, अॅशर आणि मी'
Say Hello to Noah and Asher Weber !!! #family @SunnyLeone :))))😍😍😁😁❤️. The next chapter of life !!! Karen, Nisha , Noah , Asher Me pic.twitter.com/NymfNfSRoH — Daniel Weber (@DanielWeber99) March 5, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement