एक्स्प्लोर
अभिनेत्री क्रांती रेडकरला जुळ्या मुली
मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला. क्रांतीने मार्च 2017 मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं होतं.
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरकडे आनंदाचं वातावरण आहे. क्रांतीच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालं आहे. क्रांतीने तीन डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला.
मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला. 'दुहेरी' आनंदामुळे क्रांतीचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
क्रांतीने मार्च 2017 मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं होतं. तिच्या लग्नाबाबत कुठेच फारसा गाजावाजा झाला नाही.
इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या डोहाळजेवणाच्या फोटोमुळे क्रांतीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली.
'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात क्रांतीने अभिनय केला आहे. जत्रा चित्रपटातील 'कोंबडी पळाली' गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरु केली आहे. तिने 'कांकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement