Bhagyashree Husband Surgery: 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीवर पार पडली शस्त्रक्रिया; पोस्ट शेअर म्हणाली, 'चार तास..'
सोशल मीडियावरील पोस्टमधून भाग्यश्रीनं तिच्या पतीवर म्हणजेच हिमालय दसानी (Himalaya Dasani) यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेबाबत सांगितलं. तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Bhagyashree Husband Surgery: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'मैने प्यार किया (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. भाग्यश्रीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून भाग्यश्रीनं तिच्या पतीवर म्हणजेच हिमालय दसानी (Himalaya Dasani) यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेबाबत सांगितलं. तिनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भाग्यश्रीनं शेअर केली पोस्ट
भाग्यश्रीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिमालय दसानी हे हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले दिसत आहेत. तसेच डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेताना दिसत आहे. व्हिडीओला भाग्यश्रीनं कॅप्शन दिलं, 'हिमालय यांची उजव्या खांद्याची सर्जरी जळपास चार तास सुरु होती. त्यांची सर्जरी व्यवस्थित पार पडली. डॉ. गौतम तवारी आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानते.' अंकिता लोखंडे, अर्चना पूरन सिंह, शक्ति कपूर, संजय कपूर या कलाकारांनी भाग्यश्रीच्या पोस्टला 'गेट वेल सून' अशी कमेंट केली.
भाग्यश्रीने 1990 मध्ये हिमालयसोबत लग्नगाठ बांधली. भाग्यश्री आणि हिमालय यांचा मुलगा अभिमन्यु दसानी हा देखील अभिनय क्षेत्रात काम करतो. त्यानं मर्द को दर्द नही होता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
View this post on Instagram
मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भाग्यश्रीच्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. भाग्यश्रीला सोशल मीडियावर 1 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Bhagyashree : वयाच्या 52 व्या वर्षी देखील इतका फिटनेस; भाग्यश्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक्