Bhagyashree : वयाच्या 52 व्या वर्षी देखील इतका फिटनेस; भाग्यश्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक्
'मैने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटामुळे भाग्यश्रीला (Bhagyashree) विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
![Bhagyashree : वयाच्या 52 व्या वर्षी देखील इतका फिटनेस; भाग्यश्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक् bhagyashree did dance with husband at age of 52 video is going viral Bhagyashree : वयाच्या 52 व्या वर्षी देखील इतका फिटनेस; भाग्यश्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक्](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/554b9f5ff05c63508111e5f5c5b8f338_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhagyashree Dance Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. भाग्यश्री तिच्या डान्सचे व्हिडीओ तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच भाग्यश्रीने पती हिमालय दस्सानी (Himalaya Dassani)सोबतचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील भाग्यश्रीच्या फिटनेसने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
भाग्यश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लाल रंगाचा टॉप, व्हाइट शॉर्ट्स आणि गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. तर भाग्यश्रीचे पती हिमालय हे व्हाइट टिशर्ट आणि निळी जिन्स अशा लूकमध्ये दिसत आहे. दोघांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी व्हिडीओला कमेंट करत भाग्यश्रीच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. भाग्यश्री आणि हिमालय हे न्यू ईयर पार्टीसाठी गोव्याला गेले होते. गोव्यामधील त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो भाग्यश्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
भाग्यश्री ही 52 वर्षाची आहे. मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भाग्यश्रीच्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. भाग्यश्रीला सोशल मीडियावर 1 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
संबंधित बातम्या
AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?
The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)