एक्स्प्लोर
आमिरचा भाऊ फैजल खानचं 19 वर्षांनी पुनरागमन
'मेला' चित्रपटानंतर गायब झालेला आमिर खानचा भाऊ फैजल खान 'फॅक्टरी' नावाच्या सिनेमातून पुन्हा चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवत आहे. या सिनेमासाठी फैजलने पार्श्वगायनही केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान तुम्हाला आठवतोय का? आमिर आणि ट्विंकल खन्नासोबत 'मेला' चित्रपटात झळकलेला फैजल मोठ्या पडद्यावरुन गायब झाला. मात्र तब्बल 19 वर्षांनी फैजल बिग स्क्रीनवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
'फॅक्टरी' नावाच्या सिनेमातून फैजल पुन्हा चित्रपटाकडे मोर्चा वळवत आहे. या सिनेमासाठी फैजलने पार्श्वगायनही केलं आहे. फॅक्टरी चित्रपटात 'इष्क तेरा..' हे रोमँटिक गाणं फैजलने गायलं आहे. शारीक मिनाजने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचा विषय ताकदीचा असून प्रेक्षक सिनेमा नक्की पाहतील, असा विश्वासही फैजलला वाटतो.
52 वर्षीय फैजल हा निर्माते ताहीर हुसैन यांचा पुत्र, तर अभिनेता आमिर खानचा धाकटा भाऊ. 1969 मध्ये म्हणजेच वयाच्या तिसऱ्या वर्षी फैजलने काका नासीर हुसैन यांच्या 'प्यार का मौसम' चित्रपटात लहानशी भूमिका साकारली होती.
22 व्या वर्षी फैजलने आमिर खानच्या कयामत से कयामत तक (1988) मध्ये छोटीशी व्यक्तिरेखा केली होती. आमिरची भूमिका असलेल्या तुम मेरे हो (1990) सिनेमासाठी फैजलने वडिलांना दिग्दर्शनात सहाय्य केलं होतं.
विक्रम भट दिग्दर्शित मदहोश (1994) हा फैजलची मुख्य भूमिका असलेला पहिला सिनेमा. त्यानंतर तो 'मेला' (2000) चित्रपटात आमिरसोबत झळकला. चिनार दास्तान ए इश्क, चांद बुझ गया, बॉर्डर हिंदुस्तान का, दुश्मनी यासारखे सिनेमे कधी आले, कधी गेले हेही समजलं नाही. फैजलची भूमिका असलेला डेंजर हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तर काँट्रॅक्ट हा तामिळ चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
फैजल 2007 साली दोन दिवसांसाठी बेपत्ता झाला होता. आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे भाऊ आमिरने नजरकैदेत ठेवल्याची तक्रार फैजलने बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी पोलिसात नोंदवली होती. फैजल पुण्यात सापडल्यानंतर त्याला पुन्हा मुंबईला आणण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement