Aamir Khan And Reena Dutta divorced: आमिर खानने पहिली बायको रीना दत्ताला रक्ताने लिहिले होते प्रेमपत्र; 'या' कारणामुळे 16 वर्षांनी नातं तुटले!
Aamir Khan and Reena Dutta: आमिर आणि रीना यांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटामागील कारण नेमकं काय होतं? याबाबत जाणून घेऊयात...

Aamir Khan and Reena Dutta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्ता (Reena Dutta) यांची लव्हस्टोरी हटके आहे. 90 च्या दशकातील सुपरहिट रोमँटिक हिरो आमिर खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिर खान त्याच्याच शेजारी रीना दत्ता हिच्या प्रेमात पडला होता. तसेच आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने रीना दत्ताला रक्ताने प्रेमपत्र लिहिले होते. एवढेच नाही तर दोघांनीही घरातून पळून जाऊन गुपचूप लग्न लग्न केले. पण त्यानंतर लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटामागील कारण नेमकं काय होतं? याबाबत जाणून घेऊयात...
रीनानं दिला होता नकार
आमिर खानने स्वत: एका मुलाखतीत त्याच्या आणि रीनाच्या प्रेमकथेबद्दल सांगितलं होतं. रीना दत्ता ही त्याच्या शेजारी राहत होती, रीनाला पाहण्यासाठी आमिर घराच्या खिडकीकडे टक लावून बघत बसायचा. नंतर त्याने हिंमत एकवटून रीनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्यावर तिने 'नाही' असे उत्तर दिले.

आमिरनं रक्तानं लिहिलं प्रेमपत्र
रीना दत्ताच्या नकारानंतरही आमिरनं हार मानली नाही. आमिरनं रीनाला अनेकदा प्रपोज केलं. प्रत्येक वेळी रीनानं नकार दिला नंतर आमिरनं एक नवीन युक्ती शोधून काढली. रीनाला इम्प्रेस करण्यासाठी आमिरनं स्वतःच्या रक्ताने तिला प्रेमपत्र लिहिले. असे केल्याने ती इम्प्रेस होईल असे मला वाटले होते. पण उलट ते त्याला महागात पडले. रीना तेव्हा त्याच्यावर भडकली होती. पण नंतर रीनानं लग्नासाठी होकार दिला.
आमिर आणि रीनानं गुपचूप केलं लग्न
आमिर खान आणि रीना दत्ता यांनी घरच्यांना न सांगता गुपचूप लग्न केले. या अभिनेत्याने त्याच्या डेब्यू सिनेमापूर्वीच रीना दत्ताशी गुपचूप लग्न केले होते. 1 एप्रिल 1986 रोजी त्यांनी सिक्रेट वेडिंग केलं. यानंतर दोघेही आपापल्या घरी आले आणि दोघांनीही त्यांच्या कुटुंबाला लग्नाबाबत सांगितलं नाही.

नंतर काही दिवसांनी दोघांनीही त्यांच्या कुटुंबाला लग्नाबद्दल सांगितलं. यानंतर आमिर खाननं कयामत से कयामत या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यामध्ये रीना दत्ताने कॅमिओ केला होता.
लग्नानंतर आमिर खाननं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. जो जीता वही सिकंदर, दिल, रंगीला, राजा हिंदुस्तानी आणि सरफरोश यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. त्यानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आमिरचं नाव जोडण्यात आलं.
आमिर खानच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या यशानंतर रीना आणि आमिर यांचे नाते कठीण टप्प्यातून जात होते. दोघांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर एकमेकांना घटस्फोट दिला. आमिर खान आणि बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरच्या अफवांमुळे आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला असं म्हटलं जातं.























