Aamir Ali Birthday : प्रसिद्धीची हवा डोक्यात जाताच बदलला टीव्ही अभिनेता, बॉलिवूडमध्ये मिळालं अपयश; पुन्हा मालिका करायला वाटू लागली लाज
Aamir Ali Life Story : आमिर अलीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले, पण मोठ्या पडद्यावर त्याला फारशी संधी मिळाली नाही. एका मुलाखतीत त्याने आपल्या कारकिर्दीतील जुने दिवस आठवले.
![Aamir Ali Birthday : प्रसिद्धीची हवा डोक्यात जाताच बदलला टीव्ही अभिनेता, बॉलिवूडमध्ये मिळालं अपयश; पुन्हा मालिका करायला वाटू लागली लाज Aamir Ali Birthday Special struggle story peak point of career movies Tv Serial Journey wife relationship know all here marathi news Aamir Ali Birthday : प्रसिद्धीची हवा डोक्यात जाताच बदलला टीव्ही अभिनेता, बॉलिवूडमध्ये मिळालं अपयश; पुन्हा मालिका करायला वाटू लागली लाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/31/e917102deacc059fd47dea175da03f521725097356691322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aamir Ali Birthday Special : छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंतची स्वप्न पाहिलेले अनेक अभिनेते आहेत, त्यातीच एक नाव म्हणजे आमिर अली. 'वो रहें वाली महलों की' या टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आमिर अली याचा आज 1 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. आमिरने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले, पण मोठ्या पडद्यावर त्याला फारशी संधी मिळाली नाही. एका मुलाखतीत त्याने आपल्या कारकिर्दीतील जुने दिवस आठवले, जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते.
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाताच बदलला टीव्ही अभिनेता
एकेकाळी आमिर अली हा टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता. पण, पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर आमिर अली माणूस म्हणून पूर्णपणे बदलला. आमिर अलीने मुलाखतीत खुलासा करताना सांगितलं की, पैसा आणि प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यामुळे तो खूप बदलला होता. तो मालिकेच्या सेटवर अतिशश उद्धट आणि उर्मटपणे वागायचा. याचं कारणामुळे त्याला एकता कपूरच्या बालाजी इंटरटेंनमेंटकडून नोटिसही मिळाली होती. त्याच्या रागामुळे सेटवरील अनेकांनी नोकऱ्याही गमावल्या होत्या. कारण, आमिरने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.
आमिर अलीला बॉलिवूडमध्ये मिळालं अपयश
आमिरने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे, ज्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि तो घराघरांत पोहोचला. आमिर अलीने त्याच्या कारकिर्दीत अशा अनेक चित्रपटांमध्येही काम केलं, पण ते चित्रपट कधीही थिएटरपर्यंत पोहोचलेच नाहीत. आमिरने बॉलीवूडमध्ये केलेले सर्व चित्रपट एकतर रिलीज झाले नाहीत किंवा फ्लॉप ठरले. याचा फटका मात्र आमिरला सहन करावा लागला होता. आमिर अलीकडे पैसेही संपले होते.
बॉलिवूड अभिनेता होण्याचं स्वप्न अपूर्ण
मोठ्या पडद्यावरील अभिनेता बनण्याची स्वप्न पाहणारा अभिनेता आमिर अली त्या दिवसाची वाट पाहत होता, जेव्हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होईल आणि तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल. तो स्वत:ला फिल्मस्टार समजत होता, पण चित्रपट रिलीज झाला नाही, त्यात नवीन चित्रपट मिळत नसल्याने त्याची बचत हळूहळू संपत होती. त्यावेळी पैशाच्या तंगीमुळे तो पुन्हा टीव्ही मालिकांकडे वळला. आमिर अलीने BLive स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यावेळी त्याने, बालाजीकडून टीव्ही सीरीयलमध्ये काम करण्याची ऑफरही स्वीकारली होती.
पुन्हा मालिका करायला वाटू लागली लाज
आमिर अलीची बॉलिवूड अभिनेता बनण्याची इच्छा होती पण पुन्हा टीव्ही अभिनेता बनण्यास भाग पडला, ज्यामुळे तो फार दु:खी होता. आमिरने सांगितलं की, पैशांच्या कमतरतेमुळे त्याने लो प्रोफाईल टीव्ही शोमध्ये काम करायला सुरुवात केली होती, पण त्याला ते करायला लाज वाटत होती. यामुळे तो फार निराश होता आणि त्याच्या मित्रांसमोर दु:ख व्यक्त करत रडायचा.
आमिरने सांगितलं की म्हणाला, मी रस्त्यावर, जिममध्ये, जिकडे-तिकडे रडत बसायचो. आता याचा विचार करून आज मला खूप हसू येतं, पण त्यावेळेची परिस्थिती मी आता सांगू शकत नाही. चित्रपटांची स्वप्न पाहून पुन्हा छोट्या पडद्यावर आल्यामुळे मी खूप निराश झालो होतो. मला आठवतं की, सोहेल खान त्यावेळी माझा को-स्टार होता. मी स्वतःसोबत नक्की काय करतोय, असा प्रश्नही तो मला विचारायचा, असंही आमिरने सांगितलं.
संजीदा-आमिर अलीचा घटस्फोट
आमिर अलीने अभिनेत्री संजीदा शेख हिच्यासोबत 2012 मध्ये लग्न केलं. दोघांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये एकत्र काम केलं. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या कपलच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. घटस्फोटानंतर संजीदा मुलगी आयराचा सांभाळ करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती काजोल, करण जौहरकडून खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)