एक्स्प्लोर

26/11 Mumbai Attack: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Major Film : मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली. शहीद झालेल्या मेजर संदीप यांचा 'मेजर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

26/11 Mumbai Attack : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एनएसजी कमांडर शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्या बलिदानाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत लढलेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' हा सिनेमा असणार आहे. 

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची आई धनलक्ष्मी उन्नीकृष्णन आणि वडील के. उन्नीकृष्णन यांनी आज मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये सिनेमा संबंधित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी शहीद उन्नीकृष्णन यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंवर भाष्य केले. 

उन्नीकृष्णन कुटुंबिय भावूक
मुंबई हल्ल्याच्या 13 वर्षांनंतर हिंदी, तेलुगु आणि मल्याळम भाषेत तयार होणारा 'मेजर' सिनेमा असणार आहे. सिनेमा संबंधित कार्यक्रमात आपल्या दिवंगत मुलाचे स्मरण करताना त्यांच्या आईला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. अश्रू अनावर होत असताना त्यांनी आपल्या मुलाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. संदीपचे वडील म्हणाले,"संदीप फक्त मुलगा नसून एक मित्र, शिक्षक, विद्यार्थी होता. वडील-मुलाच्या नात्यापेक्षा आमचं नातं वेगळं होतं". 

उन्नीकृष्णन यांच्या आई म्हणाल्या,"सुट्टी संपल्यानंतर संदीप सैन्यात भरती होण्यासाठी जात होता, तेव्हा त्यादेखील रेल्वे स्टेशनवर त्यांना सोडायला आल्या होत्या. संदीप परत कधीच येणार नाही, ती शेवटची भेट ठरेल याचा काहीच अंदाज नव्हता".  

शहीद मेजर संदीपच्या आईने सांगितले की, 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वीच संदीप 41 दिवसांच्या सुट्टीवर बंगळुरूमध्ये त्यांच्या घरी आला होता. त्याने त्याच्या सर्व आवडत्या ठिकाणी जाण्यापासून त्याचे सर्व आवडते छंद जोपासले होते. 'मेजर' सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 ला देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शहीद मेजर संदीपचे पात्र तेलुगू अभिनेते साकारणार आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ते अमेरिकेत असून बातम्या वाचत होते. 

संबंधित बातम्या

Phone Bhoot : Katrina Kaif, Siddhant Chaturvedi चा आगामी 'फोन भूत' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Antim : 'सूर्यवंशी' नंतर Salman Khan च्या 'अंतिम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

26/11 Mumbai Attack : 'तो काळा दिवस'; अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget