Phone Bhoot : Katrina Kaif, Siddhant Chaturvedi चा आगामी 'फोन भूत' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Phone Bhoot : कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टरचा आगामी 'फोन भूत' सिनेमा 15 जुलै 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Phone Bhoot Movie : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif), ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि सिद्धांत चतुर्वेदीचा (Siddhant Chaturvedi) आगामी 'फोन भूत' (Phone Bhoot) सिनेमा जुलै 2022 मध्ये सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. 'फोन भूत' सिनेमाच्या निर्मात्यांनी आज सिनेमाची तारीख जाहीर केली आहे. 'फोन भूत' हा एक विनोदी सिनेमा आहे. 'मिर्झापूर' फेम गुरमीत सिंग याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीचा 'फोन भूत' सिनेमा जुलै 2022 मध्ये सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे, असे एक्सेल एंटरटेनमेंटने जाहीर केले आहे. कैफ, खट्टर आणि चतुर्वेदीच्या या सिनेमाचे लेखन रवी शंकरन आणि जसविंदर सिंगने केले आहे.
कैफचे आगामी सिनेमे
कतरिना कैफ 'फोन भूत' सिनेमानंतर प्रियंका चोप्रा जोनास आणि आलिया भट्ट सोबत
'जी ले जरा' सिनेमात दिसणार आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशलची लवकरच रेशीमगाठ जुळणार
कतरिना कैफ आणि विकी कौशल ( Katrina Kaif And Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. द्याप कतरिना आणि विकी या दोघांनीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
7 ते 9 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीचा राजस्थानमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, लग्न सोहळ्याआधी ही जोडी कोर्ट मॅरेज करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर कतरिना आणि विकी कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत.
संबंधित बातम्या
Antim : 'सूर्यवंशी' नंतर Salman Khan च्या 'अंतिम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये नाही 'या' दिवशी करणार लग्न
83 Teaser Out: बहुचर्चित '83' चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha