Video | ... म्हणून अभिषेक बच्चननं ऐश्वर्याला ऑनस्क्रीन Kiss नाही केलं
हिंदी कलाविश्वात काही सेलिब्रिटी जोड्या कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन.

मुंबई : हिंदी कलाविश्वात काही सेलिब्रिटी जोड्या कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन. पॉवर कपल, म्हणूनही ही जोडी ओळखली जाते. आज ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नाचा 13 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
एकमेकांचा नितांत आदर करणारी आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी आतापर्यंत अनेकदा विविध कार्यक्रमांत एकत्र दिसली आहे, तिथं त्यांनी आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. याच साऱ्यामध्ये आता एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. 2009 मधील हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे.
'द ओप्रा विन्फ्रे शो' या कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्यानं हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी काही प्रश्नांची उत्तरंही दिली. अशातच ओप्रा यांनी या दोघांनाही एक प्रश्न विचारला. तुम्ही दोघांनीही कधी ऑनस्क्रीन किस का नाही केलं? या प्रश्नावर त्या दोघांचीही उत्तरं वेगळी होती. मुख्य म्हणजे ओप्रा यांनी हा प्रश्न विचारताच, ऐश्वर्यानं अभिषेककडे पाहिलं, आणि त्यानं तिला गालावर किस केलं. या जोडीचा हा अंदाज पाहून सर्वांनाच हसू आलं.
किस, kiss या संकल्पनेचा भारतात असणारा अर्थ किंवा त्याबाबतच्या समजाविषयी ओप्रा यांना सांगताना अभिषेक म्हणाला, 'पाश्चिमात्य देशांप्रमाणं इथं हे सारं उघडपणे केलं जात नाही. यामुळं तुम्ही तुमच्या साझीदाराचा स्वीकार करत आहात की नाही, याचा पत्ताच लागत नाही. हे गरजेचंही नाही. मला नाही वाटत की भारतीय प्रेक्षकांना हे गरजेचं वाटतं. भारतात जर दोन व्यक्ती प्रेमात आहेत तर, ते गाणी ऐकतात; पण पाश्चिमात्य देशांत याउलट आहे. इथं किस करून एकमेकांवरी प्रेमाची कबुली दिली जाते.'
अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही आतापर्यंत काही चित्रपटांच्या निमित्तानंही स्क्रीन शेअर केली आहे. ऑफस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणंच ही जोडी त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळंही चर्चेत आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
