पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक सेफ, पण दुसऱ्या आठवड्यात 9 स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार; बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस सिझन 6मध्ये पहिला वीक हा नो एलिमिनेशन वीक ठरला. परंतु, दुसऱ्या आठवड्यात 9 जण धोक्यात.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमधील कलाकारांना प्रेक्षकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या सिझनचा पहिला भाऊचा धक्का नुकताच रविवारी पार पडला. यावेळी अभिनेता आणि कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखने काही स्पर्धकांची शाळा घेतली. त्याने सर्वात आधी तन्वी कोलते हिची शाळा घेतली. तिला तिच्या चुकांबाबत माहिती देत खडेबोल सुनावले. तन्वी कोलतेसह रितेशने रूचिता जामदारची पण शाळा घेतली. यावेळी अनेक कलाकारांची त्याने कानउघडणी केली. दरम्यान, शोच्या पहिल्या आठवड्यात घरातून कुणीही बेघर झाले नाही आहे. गेला आठवडा हा नो एलिमिनेशन वीक ठरला. मात्र, रितेश देशमुख याने शोच्या शेवटी मोठा ट्विस्ट सर्वांना सांगितला. यामुळे स्पर्धकांना धक्का बसला.
रविवारी भाऊचा धक्क्यामध्ये रितेश देशमुखने आठवड्यात नेमकं काय काय घडलं, याचा आढाव घेत काही स्पर्धकांची शाळा घेतली. तसेच काही स्पर्धकांचं त्याने कौतुकही केलं. तन्वी आणि रूचिता या दोघींच्या चुकांची जाणीव करून देत, रितेशने सागर कारंडे, प्रभू शेळके, सोनाली राऊत आणि करण सोनवणे यांच्या गेमप्लॅनचं त्याने कौतुक केलं. तसेच गेममध्ये फ्रंटफूटवर येऊन खेळा असा सल्ला राकेश बापट, आयुष संजीव, राधा पाटील या स्पर्धकांना दिला. यावेळी रितेश देशमुख दिपाली सय्यदवर देखील बरसले असल्याचं पाहायला मिळालं.
भाऊचा धक्का झाल्यानंतर रितेशने स्पर्धकांसह धमाल गेम्स खेळले. नियमाप्रमाणे भाऊचा धक्का झाल्यानंतर एलिमिनेशनची वेळ आली. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? याकडे सर्वांच्यात नजरा होत्या. शोच्या पहिल्या आठवड्यात एकूण नऊ स्पर्धक एलिमिनेट झाले होते. नऊ स्पर्धकांवर एलिमिनेट होण्याची टांगती तलवार होती. मात्र, एलिमिनेडेट स्पर्धकांना सुखद धक्का बसला. कारण पहिल्या आठवड्यात स्पर्धकांना पुन्हा एक संधी देण्यात आली. अर्थात गेला आठवडा हा नो एलिमिनेशन वीक ठरला. बिग बॉसच्या घरातून कुणीही बेघर झाले नाही. यानंतर एलिमिनेडेट स्पर्धक खूश झाले. मात्र, यानंतर रितेश देशमुख याने कार्यक्रमातील मोठा ट्विस्ट सांगितला.
पहिल्या आठवड्यात ज्या स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं होतं, ते दुसऱ्या आठवड्यातही नॉमिनेट असणार आहेत, असं रितेश देशमुखने स्पष्ट केलं. या नऊ स्पर्धकांचे मागच्या आठवड्यातील व्होट्स आणि या आठवड्यातील व्होट्स बेरीज केली जाणार आहे. ज्या स्पर्धकाला कमी मतं असतील, त्याला घरातून बेघर केले जाईल, असं रितेशनं स्पष्ट केलं. दरम्यान, दुसऱ्या आठवड्यातही या नऊ स्पर्धकांवर बिग बॉसचं घर सोडण्याची टांगती तलवार असणार आहे.
























