Bharat Jadhav : भरत जाधव यांच्या 'सही रे सही' नाटकाच्या 4444 प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती, म्हणाले, 'हा एकमेव नेता...'
Bharat Jadhav : भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाचा 4444 वा प्रयोग होणार आहे.
Bharat Jadhav : मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत. ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच. यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही. आजच्या घडीलाही नवी पिढी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर घेऊन येतायत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे विक्रमी प्रयोग होणं ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. असं असलं तरीही एका नाटकाची जादू ही रंगभूमीवर आजतागायत जिवंत आहे, ही विशेष बाब आणि ते नाटक म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) यांचं 'सही रे सही' नाटक.
येत्या 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचा बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 4444 वा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भरत जाधव यांच्या मोरुची मावशी आणि अस्तित्व या नाटकाचे देखील प्रयोग याच दिवशी या नाट्यगृहात होणार आहेत. भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’च्या या विक्रमी प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थिती लावणार आहेत.
हा एकमेव नेता - भरत जाधव
राज ठाकरेंच्या उपस्थितीवर भरत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'ऑल दि बेस्ट' नाटकापासून राज ठाकरे खूप जवळ आलेली व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात त्यांनी खूप हातभार लावला आहे. अर्थात बाळासाहेबांच्यासोबत असल्यापासून त्यांचा आशीर्वाद आहे. 'सही रे सही'बाबत बोलायचं झालं तर या एका व्यक्तीने ते नाटक समोरुन पाच वेळा पाहिलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, 'हा एकमेव नेता आहे, ज्याने सुरक्षा वैगरे सगळं बाजूला सारुन मागून हा नाटक कसा करतो म्हणून साध्या टिशर्टवर विंगेतूनही नाटक पाहिलं. त्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. ही कलात्मक लोकं आहेत. आज जेव्हा मी 4444 प्रयोग करतोय, तेव्हा मला असं वाटतं की, ती व्यक्ती माझ्यासोबत असावी. त्यामुळे राज ठाकरेंना विनंती केली की तुम्ही या प्रयोगाला आणि ते येणार आहेत.'
"राजसाहेब ठाकरे म्हणजे कलात्मक व्यक्तिमत्व !
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 13, 2024
त्यांच्या हातून माझा सत्कार व्हावा हि माझी ईच्छा !
येत्या 15 ऑगस्ट ला "सही रे सही" या जगप्रसिद्ध नाटकाचा ४४४४ वा प्रयोग होणार असून मा. राजसाहेब ठाकरे या प्रयोगाला उपस्थित असणार आहेत !"
-*सुप्रसिद्ध अभिनेते श्री. भरत जाधव*… pic.twitter.com/RsYRtVYYBU