एक्स्प्लोर

Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, आरती टिकेकर,रोहिणी हट्टंगडी यांचाही होणार गौरव

Anuradha Paudwal : यंदाच्या वर्षाचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

Maharashtra State Cultural Awards : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना जाहीर झाला आहे. यासोबतच शास्त्रीय संगीतामधील योगदानासाठी आरती अंकलीकर-टिकेकर, सिनेमाक्षेत्रातील योगदानासाठी रोहिणी हट्टंगडी या कलाकारांचा गौरव होणार आहे. 

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन 2024 च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची  घोषणा

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही  घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

विविध क्षेत्रातील पुरस्कारही जाहीर

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी करण्यात आली आहे. यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे.  नाटक विभागासाठी 2024 चा पुरस्कार विशाखा सुभेदार,  उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2024 चा पुरस्कार डॉ. विकास कशाळकर,  कंठसंगीत प्रकारातील 2024 चा पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे.

लोककला क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला असून शाहीरी क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार शाहिर राजेंद्र कांबळे यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2024 साठी सोनिया परचुरे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2024 चा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे.  

तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार  संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील 2024 साठी पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात २०२४ साठी नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील 2024 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये  2024 साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : अभिजीत आणि अरबाजला मिळणार 5 पॉवरकार्डची पॉवर, नॉमिनेशनची टांगती तलवार कुणाच्या डोक्यावरुन बाजूला होणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
मनोज जरांगेंवरील कॅमेरा हटवा, बीडच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार; लक्ष्मण हाके बरसले, सुरश धसांवरही संतापले
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर क्षीरसागर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर क्षीरसागर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Embed widget