भक्तोंका इंतजार खत्म होगा! बॉबी देओलच्या 'आश्रम'चा पुढचा भाग लवरकरच येणार; टिझर रिलीज!
Ashram Season 3 : आश्रम वेब मालिकेच्या तिसऱ्या सिझनचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. त्याचा टिझर नुकताच रिलीज झाला असून बॉबी देओलने तो शेअर केला आहे.

Ashram Season 3 Part 2 Teaser Out now गेल्या अनेक दिवसांपासून आश्रम या वेबमालिकेच्या तिसऱ्या सिझनच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यावेळी बाब निराला नेमकी काय खेळी खेळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आश्रम या वेबमालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आली आहे. अॅमेझॉन एम एक्स प्लेअरने नुकतेच या वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनचा दुसऱ्या पार्टचे टिझर रिलीज केले आहे. हे टिझर पाहून आश्रम वेबमालिकेत पुढे नेमके काय होणार? याची उत्सुकता वाढली आहे.
बॉबी देओलचा दमदार अभिनय पाहायला मिळणार
आश्रम 3: पार्ट 2 ही 2025 सालातील मोस्ट अवेडेटड वेबमालिका आहे. या वेबमालिकेत बाबा निराला एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. विशेष म्हणजे या नव्या सिझनमध्ये पम्मी बाबा निरालाचा सूड घेताना दिसणार आहे. बाबा निराला हे पात्र बॉबी देओलने साकारलेले आहे. त्यामुळे या मालिकेत बॉबी देओलचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
नव्या टिझरमध्ये नेमकं काय आहे?
अभिनेता बॉबी देओलनेही हे टिझर त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे. सोबतच 'जल्दी ही भक्तोंका इंतजार खत्म होगा' असं समर्पक कॅप्शन दिलं आहे. या टिझरमध्ये बाबा निरालाच्या आजूबाजूला भक्तांची गर्दी दिसत आहे. सोबतच एका सिनमध्ये पम्मी नवरी झाल्याचे दिसत आहे. ती नवरीच्या वेशात हसताना दिसत आहे. पम्मी या सिझनमध्ये बाबा निराला आणि भोपा यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. याच टिझरनुसार पम्मी भोपासोबत जवळीक निर्माण करून बाबा निरालाविरोधात सूड उगवण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच पम्मी बाबा निरालाही ती आपल्या मोहजालात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
कोणत्या ओटीटीवर पाहायला मिळणार आश्रम 3: पार्ट 2
बॉबी देओलने शेअर केल्यानुसार आश्रम 3: पार्ट 2 हा तुम्हाला अॅमोझॉन एमएक्स प्लेअरवर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी एमएक्स प्लेअरला अॅमेझॉनने खरेदी केलेले आहे. त्यामुळे या ओटीटी मंचाचे नाव 'अॅमेझॉन एमएक्स प्लेअर' असे नामकरण करण्यात आले आहे. या ओटीटी मंचावर तुम्हाला आश्रम 3: पार्ट 2 पाहता येणार आहे.
View this post on Instagram
आश्रम 3: पार्ट 2 मध्ये कोणकोणते कलाकार आहेत?
आश्रम 3: पार्ट 2 या वेबमालिकेचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. या क्राइम-थ्रिलरच्या तिसऱ्या सिझनमध्ये बॉबी देओल प्रमुख भूमिकेत असेल. यासोबतच अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, विक्रम कोचर, अनुप्रिया गोयंका, राजीव सिद्धार्थ आणि ईशा गुप्ता आदी दिग्गज कलाकार दिसतील.
हेही वाचा :























