तिकडं कृष्णराज महाडिक बोलले अन् इकडं रिंकू राजगुरूने स्टेटस ठेवलं, 'त्या' फोटोनंतर आर्चीच्या नव्या इन्स्टा स्टोरीची चर्चा!
रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये ते महालक्ष्मीच्या मंदिर परिसरात उभे असल्याचे दिसत होते.

Rinku Rajguru And Krishnaraj Mahadik : भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबत फोटो शेअर केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. ते एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असेही सोशल मीडियावर विचारले जात होते. विशेष म्हणजे कृष्णराज महाडिक यांनी शेअर केलेल्या फोटोवर लोकांनी तुम्ही लग्न करणार आहात का? असेही विचारले होते. त्यानंतर आता या दोघांच्या नात्याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात असताना खुद्द कृष्णराज महाडिक यांनीच त्या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणानंतर आता रिंकू राजगुरूनेही या प्रकरणावर मौन सोडले आहे.
फोटोमध्ये नेमकं काय होतं?
कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते रिंकू राजगुरूसोबत दिसत होते. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी 'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,' असे कॅप्शन दिले होते. हा फोटो समाजमाध्यमावर येताच तो झटक्यात व्हायरल झाला. विशेष म्हणजे लोकांनी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या. समाजमाध्यमावर वेगवेगळी चर्चा चालू झाली. ही वाढती चर्चा लक्षात घेऊन कृष्णराज महाडिक यांनी या फोटोमागची स्टोरी सांगितली.
आम्ही चांगले मित्र आहोत
कृष्णराज महाडिक यांनी रिंकू राजगुरू ही माझी फक्त मैत्रीण आहे. आमच्यात दुसरे काहीही नाही. माझ्या फोटोमुळे गैरसमज करून घेऊन का. रिंकू राजगुरू ही माझी चांगली मैत्रीण आहे. कोल्हापुरात एक कार्यक्रम होता म्हणून ती आली होती. त्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही सोबत महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो. आम्ही तिथे फोटो काढला. हाच फोटो माझ्या सोशल मीडिया टीमकडून पोस्ट करण्यात आला. आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही टरवूनच भेटलो पण फोटोमुळे वेगळा अर्थ काढला जातोय. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. त्यापलिकडे आमच्यात काहीच नाही, असे कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.
रिंकू राजगुरूच्या इन्टाग्राम स्टोरीत नेमकं काय आहे?
कृष्णराज महाडिक यांच्या याच स्पष्टीकरणानंतर रिंकू राजगुरू हिनेदेखील या प्रकरणावरचे मौन सोडले आहे. कृष्णराज महाडिक यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे, तेच स्पष्टीकरण रिंकू राजगुरूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहे. म्हणजेच मी कृष्णराज महाडिक यांच्या मताशी सहमत आहे, असाच संदेश तिने या स्टोरीच्या माध्यमातून दिला आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

