Ashok Saraf : अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस; जाणून घ्या अशोक मामांबाबत 75 गोष्टी
अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबाबत 75 खास गोष्टी...
Ashok Saraf : अभिनयसम्राट असणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा आज 75 वा वाढदिवस. सर्वांचे लाडके असणारे अशोक मामा हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांचा खळखळून हसवतात. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबाबतच्या 75 गोष्टी...
1) 4 जून 1947 ला अशोक सराफ यांचा जन्म
2) अशोक सराफ मूळचे बेळगावचे
3) गिरगावातील डीजीटी हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण
4) विल्सन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण
5) रंगमंच, सिनेमा, टीव्ही तिन्हींमध्ये आत्मविश्वासाने वावरणारा कलाकार
6) गिरगावातील साहित्य संघ मंदिराशी जुनं नातं
7) मामा गोपीनाथ सावकार यांचं मार्गदर्शन कला क्षेत्रात मोलाचं
8) मुंबईत ग्रँट रोडच्या चिखलवाडीत सुरुवातीला वास्तव्य
9) अशोक सराफ, सुनील गावसकर चिखलवाडीतले मित्र
10) अशोक सराफ, गावसकर एकत्र क्रिकेट खेळले
11) गुरुदक्षिणा नावाच्या नाटकात अशोक सराफ, सुनील गावसकर यांनी भूमिकाही केल्या
12) सहा वर्षांचा असताना एकांकिकेत भाग घेऊन रौप्यपदक
13) स्टेट बँकेत काम करताना अभिनयाची आवड जोपासली
14) बँकेत नोकरी करत असताना नाटककार, नट रमेश पवारांशी भेट
15) रमेश पवारांसोबत ‘एकटा’ एकांकिका सादर केली
16) अशोक मामा या नावाने रसिकांमध्ये ओळखले जातात
17) कॉलेजमध्ये असताना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा गाजवल्या
18) ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटक सुरुवातीच्या काळात गाजलं
19) व्यावसायिक नाटकात ‘हिमालयाची सावली’ महत्त्वाचं नाटक
20) ‘हमीदाबाईची कोठी’मधल्या भूमिकेनेही गाजवला रंगमंच
21) ‘हमीदाबाईची कोठी’मधील भूमिकेने नाट्यविश्वात लोकप्रियता मिळाली
22) ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकातही भूमिका केली
23) संशयकल्लोळ नाटकाच्या ५०० व्या प्रयोगाला काम पाहून दिलीप कुमारांकडून कौतुक
24) ‘दोन्ही घरचा पाहुणा’द्वारे सिनेमा पडद्यावर पदार्पण
25) गजानन जागिरदार यांच्या दिग्दर्शनाखाली पहिला सिनेमा
26) ‘पांडू हवालदार’मधील सखाराम हवालदारच्या भूमिकेने लोकप्रियतेची नवी उंची
27) पांडू हवालदार, राम राम गंगाराम हे दादा कोंडकेंसोबतचे सिनेमेही गाजले
28) रजत रक्षित यांच्या 'दामाद' सिनेमातून पहिल्यांदा हिंदीत
29) मराठी आदमी यहीच मार खाता है...हा ‘दामाद’मधला मधला डायलॉग गाजला
30) एक डाव भुताचा मधील मास्तुरे..चा डायलॉग गाजला
31) ‘गुपचुप गुपचुप’मधील ‘प्रोफेसर धोंड’ची पँट वर करत हेल काढत बोलण्याची शैली लोकप्रिय
32) ‘धुमधडाका’मधील वॅख्खॅ विख्खी डायलॉगही लोकप्रिय
33) एक डाव भुताचा, चौकट राजामध्ये दिलीप प्रभावळकरांसोबत जुगलबंदी
34) वजीर, कळत नकळतमध्ये विक्रम गोखलेंसोबत एकत्र काम
35) अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे कॉम्बिनेशनने सर्वात जास्त एकत्र चित्रपट केले
36) कळत नकळत सिनेमात गाणं गायलं
37) बिपीन वर्टींच्या सगेसोयरे सिनेमातही पार्श्वगायन
38) किशोर कुमार यांचा प्लेबॅक लाभलेलं ‘अश्विनी ये ना..’ गाणं अशोक सराफांवर चित्रित
39) अष्टविनायक सिनेमातील आठ गणपतींच्या गाण्यातही सहभाग
40) वसंत पेंटर, दिनकर द. पाटील आदी दिग्दर्शकांसोबत काम करणारा अभिनेता
41) अनंत मानेंपासून समीर पाटील यांच्या पिढ्यांसोबतही काम केलं
42) रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, मधू कांबीकर आदींसोबत भूमिका
43) वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, निवेदिता, रेखा राव यांच्यासह विविध अभिनेत्रींसोबत काम
44) सोनाली कुलकर्णी (ज्युनियर, सीनियर), सुरेखा कुडची, सारिका निलाटकर यांच्यासोबतही भूमिका
45) हिंदीत करण-अर्जुन, सिंघमसारखे गाजलेले सिनेमे
46) अशी ही बनवाबनवीच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दिलीप कुमारांकडून कौतुकाची थाप
47) १९७९ मध्ये संपूर्ण वर्षभर कोल्हापूरमध्ये शूटिंग
48) १९८४ मध्ये राज्य चित्रपट महोत्सवात एकट्याचे ११ सिनेमे
49) खिलौना, दो फूल, अंगूर सिनेमाच्या रीमेकमध्ये काम, हे सिनेमे खरा वारसदार, चंगू-मंगू आणि आमच्यासारखे आम्हीच नावाने प्रदर्शित
50) बहुरुपी सिनेमातील भूमिका गाजली
51) नाना पाटेकरांशी मैत्रीचे बंध
52) सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळात अशोक सराफांनी मदत केल्याचं नाना आवर्जून सांगतात
53) कुलदीप पवारांसोबतही जोडी गाजली
54) शरद तळवलकरांसोबत धुमधडाकामधील सीन गाजले
55) सुरेश वाडकरांनी अनेक हिट गाण्यांसाठी प्लेबॅक दिला
56) निवेदिता सराफ यांच्यासोबत ‘तू सुखकर्ता’ हा चित्रपट लक्षवेधक
57) गुलछडी सिनेमात साडी नेसून अभिनय
58) ‘सगळीकडे बोंबाबोंब’मध्ये पत्रकाराची भूमिका साकारली
59) आयत्या घरात घरोबा’मध्ये गोपूकाकाची वेगळी भूमिका
60) गंमत जंमत सिनेमात चारुशीला साबळेंसोबत भूमिका
61) आमच्यासारखे आम्हीच, सगेसोयरेसारख्या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या
62) आयडियाची कल्पनामध्ये सचिन, महेश कोठारेंसोबत भूमिका
63) धुमधडाका (१९८५) नंतर आयडियाची कल्पना(२०१०) मध्ये महेश कोठारेंसह २५ वर्षांनी एकत्र भूमिका साकारली
64) शेंटिमेंटल सिनेमात पोलीस साकारला
65) पत्नी निवेदितासोबत निर्मिती संस्था स्थापन केली
66) ‘टन टना टन’सारख्या मराठी मालिकेची निर्मिती
67) चाळ नावाची वाचाळ वस्ती टीव्ही मालिकेतील भूमिकाही गाजली
68) ‘हम पाँच’ हिंदी मालिकेत अतरंगी मुलींचा बाप ताकदीने साकारला
69) रंगभूमीवर पुनरागमन करताना ‘अनधिकृत’ नाटकात भूमिका
70) अमेरिकेत सिएटलमध्ये विजय केंकरेंचं 'हे राम कार्डिओग्राम' हे नाटक सादर केलं
71) ‘सारखं छातीत दुखतंय’ नाटकात निवेदिता सराफांसोबत भूमिका
72) ‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकात निर्मिती सावंतांसोबत भूमिका
73) विनोदी अभिनेत्यांसाठीच्या शोमध्ये चीफ ऑफ ज्युरी म्हणून काम पाहिलं
74) जाहिरातविश्वातही अभिनयाची चुणूक
75) ‘मी बहुरुपी’ पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास वाचकांच्या भेटीला
विशेष मार्गदर्शन: दिलीप ठाकूर, ज्येष्ठ सिनेलेखक
हेही वाचा :