Ashok Saraf : 'वक्ख्या विक्खी वुख्खू' ते 'हा माझा बायको पार्वती'; अशोक सराफ यांचे गाजलेले डायलॉग्स
अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा आज 75 वा वाढदिवस आज आहे.
हा माझा बायको पार्वती (अशी ही बनवाबनवी)
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट हा मराठी चित्रपटसृष्टीमधील एव्हर ग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटामधील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे आणि सचिन पिळगावकर या चौघांच्या धम्माल विनोदानं प्रेक्षकांची मनं जिंकती. अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील प्रत्येक डायलॉग हे अनेकांच्या अक्षरक्ष: तोंडपाठ आहेत. या चित्रपटामधील प्रत्येक डायलॉगला प्रेक्षकांची पसंती मिळाली पण त्यामधील अशोक सराफ यांच्या 'हा माझा बायको पार्वती' हा डायलॉग अजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो.
वक्ख्या विक्खी वुख्खू (धुमधडाका)
1985 मध्ये प्रदर्शित झालेला धुमधडाका हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं पाहतात. या चित्रपटामध्ये यदुनाथ जवळकर ही भूमिका साकारणाऱ्या अशोक मामांचा 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा डायलॉग ऐकून सर्व वयातील व्यक्ती हे खळखळून हसतात.
70 रुपये वारले (अशी ही बनवाबनवी)
अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील अशोक मामांनी साकारलेली धनंजय माने यांचा लिंबू कलरच्या साडीचा डायलॉग आणि 'काही म्हणा या ऑफिसमध्ये झुरळं फार कमीच आहेत' हे हास्याचा विस्फोट आणणारे डायलॉग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटामधील 70 रुपये वारले हा डायलॉग देखील खूप गाजला.
आपण कोणाला नाय घाबरत
नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये एका बसमधील कंडक्टरची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली होती. या चित्रपटामध्ये आपण कोणाला नाय घाबरत बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण नाय घाबरत हा डायलॉग ऐकल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं.
सौदामिनी आधी कुंकू लाव
माझा पती करोडपती या चित्रपटातील अशोक मामांच्या 'सौदामिनी आधी कुंकू लाव' या डायलॉगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट 1988 मध्ये रिलीज झाला होता.
हेही वाचा :