Anupam Kher : श्रीवल्ली गाण्यावर अनुपम खेर यांच्या आईने केला डान्स ; पाहा व्हिडीओ
अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आईने श्रीवल्ली या गाण्यावर डान्स केला आहे.
Anupam Kher : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली. चित्रपटातील श्रीवल्ली आणि सामे या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आईने म्हणजेच दुलारी खेर यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दुलारी खेर या श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करून अनुपम यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आईचा हा व्हिडीओ रेकोर्ड केल्याबद्दल वृंदा तुझे आभार मानतो' अनुपम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला डेलनाज ईरानीनं कमेंट करत लिहिले, 'क्यूट' तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावरअॅक्टिव्ह असतात. ते त्यांच्या आईचे मजेदार व्हिडीओ शेअर करत असतात.
संबंधित इतर बातम्या
Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha