Ankita Lokhande : अंकिताची लगीनघाई, बॅचलर पार्टीची तयारी सुरु; या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे.
Ankita Lokhande Bachelorette Party : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. अंकिता विक्की जैन (Vicky Jain)सोबत डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. लग्नसोहळा 12,13,14 डिसेंबरला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, अशी चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार सध्या अंकिता तिच्या बॅचलर पार्टीची तयारी करत आहे. लग्नाआधी गोव्यात (Goa)अंकिताची बॅचलर पार्टी होणार आहे.
रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे जवळच्या मित्र-मैत्रीणींसोबत बॅचलर पार्टीसाठी गोव्याला जाणार आहे. अंकिताने अजून तिच्या बॅचलर पार्टीबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण तिच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. अंकिता विक्कीसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. रिपोर्टनुसार अंकिताचा लग्नसोहळा 12 डिसेंबर रोजी मुंबईमधील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने 'ब्राइट टू बी' असं लिहीलेल्या तिच्या फूटवेअरचा फोटो शेअर केला होता.
View this post on Instagram
बाबो! काय सांगता? कतरिनाचं वार्षिक उत्पन्न ऐकून व्हाल थक्क; चित्रपटांसह स्वतःच्या ब्रँडमधून कोट्यवधींचं 'इनकम'
अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग होणार नाही
अंकिताचे ग्रॅंड रॉयल डेस्टीनेशन वेडिंग होणार नाही. अंकिताच्या मते,"डेस्टीनेशन वेडिंग हा आता स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. त्यात बराच पैसा वाया जातो". विकी कौशल आणि कतरिना कैफ, राजकुमार राव आणि पत्रलेखासोबत अंकिता लोखंडे आणि विकी कौशलच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत.
Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा