Ankita Lokhande : मालदीवमध्ये 50 कोटींचा बंगला, प्रायव्हेट बोट; अंकिता लोखंडे अन् विकी जैननं एकमेकांना दिले महागडे गिफ्ट
Ankita Lokhande : लग्नानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
Ankita Lokhande : लग्नामध्ये वधूवरांला अनेक भेटवस्तू भेटतात. विवाह सोहळ्यात वरवधूचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्याकडून भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, अभिनेत्री अकिंता लोखंडे (Ankita Lokhande) आणि पती विकी जैन (Vicky Jain) यांनीच एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर अंकिताने पती विकीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
विकीने अंकिताला दिला 50 कोटींचा बंगला
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा 14 डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. यांच्या लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. त्यांना लग्नामध्ये लाखो रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार महत्त्वाचे म्हणजे विकीने अंकिताला मालदीवमध्ये 50 कोटींचा बंगला भेट म्हणून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकितानेही विकीला प्रायव्हेट बोट (Private Yacht) भेट म्हणून दिला आहे. या बोटीची किंमत सुमारे 8 कोटी असल्याचे बोलले जात आहे.
लग्नानंतर 'या' घरात राहणार
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाआधीच अंकिता आणि विकीने मुंबईत आठ बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. लग्नानंतर अंकिता आणि विकी याच घरात राहायला जाणार आहेत. सध्या दोघेही लग्नानंतरच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. अंकिता आणि विकीचं रिसेप्शन रायपूरमध्ये पार पडणार आहे. यामध्ये अंकिता आणि विकीचे कुटुंबिय, मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. विकी मूळचा रायपूरचा राहणारा असल्यामुळे तिथे रिसेप्शन होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम
- Trending : भारतीय तरुणाने दाखवल्या गुगलमधल्या त्रुटी, जिंकले 3.5 लाख रुपये
- कर्नाटक काँग्रेस आमदाराचे विधानसभेत वादग्रस्त टिप्पणी, बलात्कारापासून बचाव करता येत नसेल तर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha