एक्स्प्लोर

Rohit Pawar: 'तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल? या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं' रोहित पवारांचा थेट गर्भित इशारा

मी 'इव्हेंट' किंवा 'स्टंट' करत आहे तर तुम्ही सत्तेत आहात, तर सत्तेचा वापर करून केवळ राजकारण करण्यापेक्षा अजितदादांचा एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

Rohit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा काकी (सुनेत्रा पवार) या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आहेत. परंतु, सार्वजनिक कार्यक्रमात किंवा स्टेजवर वागत असताना ते चार नेते  त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागत आहेत, ते चुकीचे आहे. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, तर कोणी त्यांना ओढतंय, हे बघून महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं वाटत नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला आहे. मी 'इव्हेंट' किंवा 'स्टंट' करत आहे तर तुम्ही सत्तेत आहात, तर सत्तेचा वापर करून केवळ राजकारण करण्यापेक्षा अजितदादांच्या मृत्यूचा एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. 

केवळ दोन वर्षांचा विषय का दाखवला गेला?

कार्यक्रमात दादांची 40 वर्षांची कारकीर्द दाखवण्याऐवजी केवळ दोन वर्षांचा विषय का दाखवला गेला? दादांचे मोठे कार्य त्या व्हिडिओमध्ये छोटे दाखवण्याचा प्रयत्न झाला, याची खंत वाटते, अशी टीकाही त्यांनी केली. अजित दादांच्या निधनानंतर पवार साहेब इतके भावूक झाले होते की त्यांना शब्द फुटत नव्हते, म्हणून त्यांना काही गोष्टी लिहून वाचाव्या लागल्या. यात आम्ही राजकारण केलेले नाही, असे रोहित पवार यांनी नमूद केलं

थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं

रोहित पवारांनी या चार नेत्यांना इशारा दिला की, "जर कोणाला वाटत असेल की अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल (नियंत्रित) करू शकतो, तर ते भ्रमात आहेत. त्यांनी सांगितले की, काकी सक्षम आहेत आणि पवार कुटुंबातील घटक आहेत, त्यामुळे या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं, असा सज्जड दम त्यांनी भरला.

तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल 

त्यांनी एका व्हिडिओचा हवाला देऊन सांगितले की, हे चार लोक अजितदादांना त्यांच्या स्वतःच्या आमदारांपासून आणि कार्यकर्त्यांपासून लांब ठेवत होते. जर एखाद्या नेत्याला आमदारांपासूनच हे चार लोक लांब ठेवत असतील, तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे चार नेते केवळ स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी काही विषयांना विनाकारण जिवंत ठेवत आहेत. दादांचा या नेत्यांवर वचक होता, पण आता त्यांनी सुनेत्रा काकींचा आदर राखला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
Ind vs Nz Final : मी सांगून सांगून थकलोय...; फायनलपूर्वी आर. अश्विन भारतीय गोलंदाजावर संतापला, दिला थेट अल्टिमेटम
मी सांगून सांगून थकलोय...; फायनलपूर्वी आर. अश्विन भारतीय गोलंदाजावर संतापला, दिला थेट अल्टिमेटम
Ind vs Nz Final : नरेंद्र मोदी स्टेडियम टीम इंडियासाठी लकी नाही..; फायनलपूर्वी पाकिस्तानी दिग्गजाची भाकीत, कोण होणार चॅम्पियन?
नरेंद्र मोदी स्टेडियम टीम इंडियासाठी लकी नाही..; फायनलपूर्वी पाकिस्तानी दिग्गजाची भाकीत, कोण होणार चॅम्पियन?
Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...
न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Embed widget