एक्स्प्लोर

Pune News: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह, मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्...; नेमकं काय घडलं?

Pune News: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Pune News: पुण्यातील (Pune) ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दशरथ शंकर धोत्रे (मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत मजुराचे नाव आहे.

दशरथ धोत्रे हे चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते. बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते. 

Pune News: पर्यटकांना दरीत दिसला मृतदेह

त्यांच्या सहकाऱ्यांना ते गावाकडे निघून गेले असावेत, अशी शंका होती. दिवसभर त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांना दरीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. राजगड पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Pune Crime News: पोलिसांची मनोज कट्टीमणीवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

दरम्यान, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार मनोज नागराज कट्टीमणी याच्यावर पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कडक कारवाई केली आहे. त्याला एका वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनोज कट्टीमणी हा समर्थ आंगण सोसायटी, भैरवनाथ नगर, किरकटवाडी (ता. हवेली) येथील रहिवासी असून तो पुणे पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.

2021 पासून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शिवीगाळ व धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा स्वरूपाचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिक भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधक कारवाई केली होती; मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याने अखेर त्याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेड सिटी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची भूमिका अधिक ठाम झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा 

Pune Crime News: जिगरी यार दारू प्यायला गेले अन्...; 20 रूपयांच्या उधारीवरून मित्रानेच मित्राचा गळा चिरला, रक्तीनं शर्ट माखलेला पाहून पळ काढला, पिंपरीतील घटना

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget