Trending : पठ्ठ्यानं दाखवल्या गुगलमधील चुका, जिकलं लाखोंचं बक्षीस
Trending : भारतातील एक इंजिनीअर सध्या खूप चर्चेत आहे. त्याने यात गुगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्ममधील त्रुटी दाखवत या कामासाठी 3.5 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले आहे.
Trending : भारतातील एका तरुणाने चक्क गुगलला (Google) त्याच्या प्लॅटफॉर्ममधील त्रुटी दाखवली आहे. एवढेच नाही तर या कामासाठी 3.5 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले आहे. सध्या या भारतीय तरुणाची देश-विदेशात सर्त्र जोरदार चर्चा आहे. रॉनी दास (Rony Das) असे या तरुणाचे नाव आहे.
टेक कंपन्यांकडून अनेक वेळा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये एखाद्याला कोणत्याही कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपमध्ये काही कमतरता आढळल्यास, त्याला बक्षीस म्हणून पैसे दिले जातात. गुगलकडून अशाच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुगलच्या या स्पर्धेत आसामच्या रोनी दासने गुगलच्या अँड्रॉईट प्लॅटफॉर्ममधील त्रुटी दाखवत बक्षीस जिंकण्यात यश मिळवले.
गुगलने घेतली त्रुटीची गंभीर दखल
रिपोर्टनुसार, रॉनीने स्पर्धेत अँड्रॉईड फॉरग्राऊंड सर्व्हिसमध्ये (Android Foreground) एका बगबद्दल गुगलला सांगितले. या बगद्वारे बँकिंग मालवेअर आणि हॅकर्स यातून लोकांचा डेटा कसा चोरु शकतात हे त्यांनी सांगितले. गुगलने रॉनी दास यांनी दाखवलेल्या त्रुटीची गांभीर्याने दखल घेतली आहे. यासोबतच त्याला यासाठी साडेतीन लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले होते.
कोन आहे रॉनी दास?
रॉनी दास आसामचा राहणार असून त्यांना सुरक्षा संशोधनात (Security Research) अधिक रस आहे. एक सॉफ्टवेअर (Software) बनवताना अँड्रॉईडमध्ये असलेल्या या त्रुटी जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले. रॉनी सध्या आसाममध्ये सुरक्षा संशोधक (Security Researcher) म्हणून काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- कर्नाटक काँग्रेस आमदाराचे विधानसभेत वादग्रस्त टिप्पणी, बलात्कारापासून बचाव करता येत नसेल तर...
- Data Protection Bill: आपल्या डिजिटल आयुष्यात महत्वाचं ठरणार डेटा प्रोटेक्शन बिल, काय आहे बिल
- Airtel Jio Vi : दररोज 1.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगचे 'हे' प्लान, कोणता योग्य?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha