Amruta Fadnavis : महाशिवरात्रीच्या आधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; केली घोषणा
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली.
![Amruta Fadnavis : महाशिवरात्रीच्या आधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; केली घोषणा Amrita Fadnavis new song release before Mahashivaratri Amruta Fadnavis : महाशिवरात्रीच्या आधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; केली घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/39a47757d717ef7cb3b8ca0a7d5b8cb6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amruta Fadnavis New Song : जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमृता यांनी यावेळी अनेक विषयांवरील त्यांची मतं व्यक्त केली. तसेच त्यांच्या नव्या गाण्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमृता यांनी सांगितलं की, महाशिवरात्रीच्या आधी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण अमृता यांनी अजून या गाण्याचे नाव जाहीर केले नाही. अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वी गणेश वंदना हे गीत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायिका योहानीचे Manike Mage Hithe हे गाणं देखील अमृता फडणवीस यांनी गायले होते. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. दिवाळीला देखील अमृता यांनी त्यांचे ओम जय लक्ष्मी माता हे गीत प्रदर्शित केलं होतं. हे गीत अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायले आहे. तसेच अमृता यांनी 'तिला जगू द्या' हे गाणे सोशल मीडियावर शेअर भाऊबीजेनिमित्त शेअर केले होते.
View this post on Instagram
हेही वाचा :
- Mister Mummy First Look : रितेश आणि जेनेलियानं दिली 'गूड न्यूज' ; 'मिस्टर मम्मी'चा पोस्टर रिलीज
- Gangubai Kathiawadi: 'आ रही है गंगू'; बहुचर्चित गंगूबाई काठियावाडीचं नवा पोस्टर प्रदर्शित
- भाजप आणि आरएसएस हे पुरोगामी आणि स्त्रियांचा सन्मान करणारे: अमृता फडणवीस
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)