एक्स्प्लोर

भाजप आणि आरएसएस हे पुरोगामी आणि स्त्रियांचा सन्मान करणारे: अमृता फडणवीस

Amruta Fadnavis on RSS BJP : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्त्रियांचा सन्मान करणारे असून पुरोगामी आहेत असे वक्तव्य अमृता फडवणीस यांनी केले आहे.

Amruta Fadnavis on RSS BJP : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्त्रियांचा सन्मान करणारे असून पुरोगामी असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. स्त्री या विषयी बोलताना टिप्पणी करताना काय बोलले पाहिजे हे विचार करून बोलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.  बंडातात्या कराडकर यांनी राजकीय क्षेत्रातील महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी दर्शवली. 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार विरोध दर्शवला आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यामागे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्त्री मान ठेवणारे आहे त्यामुळे विरोधक बंडातात्या यांना आरएसएस पाठबळ आहे हे म्हणणं चुकीच असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजप आणि संघाच्या लोकांना ओळखते असेही त्यांनी सांगितले. 

अमृता फडणवीस यांनी म्हटले की, स्त्री या विषयी बोलताना टिप्पणी करताना काय बोलले पाहिजे हे विचार करून  बोलले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर काहीही बोलायला नको. एखाद्या कंपनीतील भागिदारीमध्ये महिला असतात. मात्र, त्या ठिकाणी होत असलेल्या घोटाळ्याबाबत महिलेला माहिती असते असे नाही, असेही अमृता यांनी म्हटले. 

दरम्यान, वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या मठावर दाखल झालेत. फलटणच्या पिंपरद इथल्या बंडातात्या यांच्या मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून अटक होण्याची दाट शक्यता आहे. 

आज सकाळी बंडातात्या यांच्या फलटण येथील मठावर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी बंडातात्यांसोबत चर्चा केली. दारु आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलीस बंडातात्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना पिंपरद  येथून फलटण येथे नेले आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच अतिधोकादायक! महापौर, 78 नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार
उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच अतिधोकादायक! महापौर, 78 नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Embed widget